advertisement

Air Canada Express Plane Accident: STOP-STOP-STOP! एअर ट्रॅफिक कंट्रोलर ओरडला, लॅण्डिंगदरम्यान विमान आणि ट्रकची धडक, थरकाप उडवणारे PHOTO

Last Updated:
मॉन्ट्रियलहून येणारे Air Canada Express विमान La Guardia येथे ट्रकला धडकले; Nose चेंदामेंदा, अनेक प्रवासी व अग्निशमन जवान जखमी, FAA ने रनवे बंद केला.
1/9
इस्रायल-इराण युद्धसंघर्ष सुरू असताना न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठा आणि भीषण अपघात झाला. 80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाची रनवेवरील ट्रकला भीषण धडक झाली. विमान लॅण्डिंग करत असताना झालेल्या या भीषण अपघातात विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.

2/9
या अपघाताने प्रचंड नुकसान झालं आहे. मॉन्ट्रियलहून न्यू यॉर्कला येत असलेलं एअर कॅनडा एक्सप्रेसचं विमानला गार्डिया विमानतळावर लँडिंग करत असतानाच समोरून येणाऱ्या एका अग्निशमन दलाच्या ट्रकला जोरात धडक झाली. या अपघातात विमानाचं अतोनात नुकसान झालं असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

3/9
सोशल मीडियावर या घटनेचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते पाहून अंगावर काटा येईल. विमानाचा समोरचा भाग Nose पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या धडकेत काही प्रवासी आणि विमानाच्या मदतीला धावलेले अग्निशमन दलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत.

4/9
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक न्यूज एजन्सीकडून मिळाली आहे. या भीषण अपघातानंतर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशनने (FAA) रनवे बंद ठेवला आहे.

5/9
ATC आणि वैमानिक यांच्यातील एक संवादाचा एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यूज 18 मराठी या ऑडिओ क्लीपची कोणतीही खातरजमा करत नाही. ऑडिओमध्ये ऐकू येतंय की, सुरुवातीला ट्रक १ ला रनवे क्रॉस करण्याची परवानगी मागितली जाते. पण अचानक परिस्थिती हाताबाहेर जाते.

6/9
समोरून विमान येत असल्याचं लक्षात येताच एटीसी अधिकारी ओरडू लागतो,
समोरून विमान येत असल्याचं लक्षात येताच एटीसी अधिकारी ओरडू लागतो, "ट्रक १, थांबा! मुळीच पुढे जाऊ नका!" मात्र, काही सेकंदातच विमानाची आणि ट्रकची भीषण धडक होते. या धडकेनंतर एटीसी अधिकारी पुढच्या विमानाला ओरडून सांगतो, "डेल्टा २६०३, गो-अराऊंड! रनवे बंद आहे!"
advertisement
7/9
या विमानतळावरून आता कोणतंही विमान उडू शकणार नाही आणि बाहेरून येणारी विमानं दुसऱ्या विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.
या विमानतळावरून आता कोणतंही विमान उडू शकणार नाही आणि बाहेरून येणारी विमानं दुसऱ्या विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत. "इमर्जन्सी प्रतिसाद सुरू असून जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत विमानतळ बंद राहील," असा आदेश देण्यात आला आहे.
advertisement
8/9
ला गार्डिया विमानतळ हे जगातील सर्वात आव्हानात्मक विमानतळांपैकी एक मानलं जातं. हे विमानतळ पाण्याने वेढलेलं आहे आणि याचे रनवे खूप लहान आहेत. त्यामुळे इथे लँडिंग करणं म्हणजे पायलटसाठी मोठी कसोटी असते.

9/9
एअर ट्राफिक कंट्रोलरच्या ही गोष्ट लक्षात आली होती. मात्र त्याने दोन्हीकडे मेसेज कन्वे करेपर्यंत उशीर झाला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे पायलटची की एअर ट्रॅफिक कंट्रोलरची की सिग्नलचा प्रॉब्लेम होता याची चौकशी केली जात आहे.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement