advertisement

बायकोवर हात टाकला, तरुणाने थेट अशोक खरातचं साम्राज्यच केलं उद्ध्वस्त, केबिनमध्ये कॅमेरे कसे लावले?

Last Updated:

Ashok Kharat Viral Obscene Videos: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पण हे सगळं कांड उघडकीस कसं आलं. अशोक खरातच्या अस्ताची स्टोरी...

अशोक खरातचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त झालं?
अशोक खरातचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त झालं?
Ashok Kharat Viral Obscene Videos: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर १७ मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला होता. एका विवाहित महिलेनं त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्री उशिरा अशोक खरातची राहत्या घरातून उचलबांगडी केली. अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असणाऱ्या अशोक खरातला अटक करताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.
आता अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. रविवारी एका घटस्फोटीत महिलेनं आणि २०२३ मध्ये ७ महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेनं अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अशोक खरातचं हे अघोरी साम्राज्य उद्ध्वस्त कसं झालं. त्याचा पर्दाफाश कुणी केला? केबिनमध्ये कॅमेरे कसे लागले, याची माहिती समोर आली आहे.
advertisement
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा पर्दाफाश त्याच्या एकेकाळच्या अगदी जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तीने केला आहे. एकेदिवशी खरातने केलेला लंपटपणा त्याच्या अंगाशी आला आणि त्याचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालं.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, खरातचा पर्दाफाश करणारी व्यक्ती आणि खरात एकमेकांना चांगलं ओळखतात. संबंधित व्यक्ती खरातची निस्सीम भक्त होती. २०२३ मध्ये तो आपल्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे आला होता. पत्नी ७ महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे तिची प्रसूती सुरक्षित व्हावी. बाळ सुरक्षित राहावं, यासाठी तो खरातकडे घेऊन आला होता. यावेळी खरातने काही पूजा करायची असल्याचं सांगत या व्यक्तीला केबिनच्या बाहेर काढलं.
advertisement
खरातच्या प्रभावाखाली असल्याने संबंधित व्यक्ती केबिनच्या बाहेर गेली. पण त्यानंतर खरातने केबिनमधील लाईट बंद करून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवर हात टाकला. अश्लील चाळे करायला सुरुवात केली. केबिनमधून बाहेर पडल्यानंतर महिलेनं घडलेला सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. सुरुवातीला त्याला यावर विश्वास बसला नाही. मात्र तिने आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतली. तेव्हा संबंधित व्यक्तीला विश्वास बसला. इथूनच खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागला.
advertisement
ओळखीच्या व्यक्तीने आधी खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. त्याला संशय बळावल्यानंतर त्याने खरातच्या ऑफिसमध्ये छुपा कॅमेरा बसवला आणि त्याने केबिनमधील लैंगिक छळाचे अनेक व्हिडीओ शूट केले. यानंतर याच व्यक्तीने हे सर्व व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये घेऊन नाशिक पोलिसांकडे दिले. संबंधित व्हिडीओ पाहून पोलिसांना देखील धक्का बसला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
बायकोवर हात टाकला, तरुणाने थेट अशोक खरातचं साम्राज्यच केलं उद्ध्वस्त, केबिनमध्ये कॅमेरे कसे लावले?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement