हिंदू नवं वर्षातील पहिली एकादशी कधी? कामदा एकादशी डेट, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, एका क्लिकवर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'कामदा एकादशी' म्हटले जाते. ही हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असल्याने आध्यात्मिकदृष्ट्या ती विशेष मानली जाते.
Kamada Ekadashi 2026 : हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'कामदा एकादशी' म्हटले जाते. ही हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असल्याने आध्यात्मिकदृष्ट्या ती विशेष मानली जाते. 'कामदा' म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात.
कामदा एकादशी 2026: योग्य तारीख
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल एकादशी तिथी 28 मार्च 2026 रोजी सकाळी 08:45 वाजता सुरू होईल आणि 29 मार्च 2026 रोजी सकाळी 07:46 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात 'उदया तिथी' महत्त्वाची मानली जाते. 29 मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने, कामदा एकादशीचे व्रत रविवार, 29 मार्च 2026 रोजी ठेवणे शास्त्रसंमत आणि शुभ ठरेल.
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त
कामदा एकादशीच्या दिवशी, ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:01 वाजता सुरू होतो आणि हा मुहूर्त 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी सुरू होत असून दुपारी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत असेल. हे दोन्हीही मुहूर्त कामदा एकादशीच्या पूजेकरिता सर्वोत्तम आहेत.
व्रत सोडण्याची वेळ
एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक असते. द्वादशी तिथीला सूर्योदयांनंतरच व्रत सोडावे. सोमवार, 30 मार्च 2026 रोजी सकाळी 06:14 ते 07:09 या दरम्यान उपवास सोडावा. द्वादशी तिथी संपण्यापूर्वीच पारण करणे अनिवार्य आहे, अन्यथा व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही, असे शास्त्र सांगते.
advertisement
पूजा विधी आणि नियम
एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला सात्विक आहार घ्यावा आणि रात्री उशिरा जेवणे टाळावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र परिधान करावे. विष्णूच्या मूर्तीला पिवळी फुले, तुळशीचे पान आणि पिवळी फळे अर्पण करावीत. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, त्यांनी या दिवशी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
हिंदू नवं वर्षातील पहिली एकादशी कधी? कामदा एकादशी डेट, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, एका क्लिकवर









