शुक्र-केतूचं गोचर चमकवणार 4 राशींचं भाग्य, 7 दिवसांत मिळणार मोठी गूड न्यूज; तुम्हीही आहात का लकी?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 26 मार्च 2026 रोजी सुखाचा कारक शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर त्याच्या दोनच दिवसांनी म्हणजेच 29 मार्च 2026 रोजी केतू स्वतःच्या 'मघा' नक्षत्रात गोचर करणार आहे.
advertisement
advertisement
मेष - व्यक्तिमत्व आणि सुखात वाढ: शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या आकर्षणात आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. शुक्र हा भौतिक सुखाचा स्वामी असल्याने तुम्ही नवीन वाहन किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. केतूच्या नक्षत्र बदलामुळे तुमची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
advertisement
सिंह - आर्थिक समृद्धी आणि प्रगती: सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचे मघा नक्षत्रातील गोचर वरदान ठरेल. हे नक्षत्र तुमच्या राशीसाठी अनुकूल असल्याने व्यवसायात 'बंपर' नफा मिळण्याची शक्यता आहे. शु्क्राच्या प्रभावामुळे तुमचे प्रेमसंबंध अधिक मधुर होतील आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 7 दिवसांत तुम्हाला धनलाभाची मोठी बातमी मिळू शकते.
advertisement
advertisement
advertisement
7 दिवसांत मिळतील शुभ संकेत: या 4 राशींच्या जातकांना येत्या आठवड्यात नोकरीत बढती, पगारवाढ किंवा नवीन प्रकल्पाचे नेतृत्व मिळण्याचे संकेत आहेत. जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची निर्णयक्षमता तीक्ष्ण होईल, ज्यामुळे तुम्ही कठीण आव्हाने सहज पेलू शकाल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







