व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरोंना ट्रम्प यांची खतरनाक शिक्षा; ‘जिथे जगणे अशक्य’ अशा ठिकाणी थेट डांबले, निर्णयाने जगभर खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Nicolas Maduro Jail: अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांना न्यूयॉर्कमधील ‘पृथ्वीवरील नरक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात MDC ब्रुकलिन तुरुंगात ठेवले आहे.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. मादुरो यांना सध्या न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये (MDC) ठेवण्यात आले आहे. ही कोणतीही सामान्य तुरुंग व्यवस्था नसून, गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखालील कुख्यात कैद्यांसाठी ओळखली जाणारी कारागृह व्यवस्था आहे.
advertisement
ब्रुकलिनमधील हे MDC गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवस्था, सुरक्षा त्रुटी आणि अमानवी परिस्थितीमुळे चर्चेत आहे. परिस्थिती इतकी बिकट होती की काही न्यायाधीशांनी या तुरुंगात आरोपी पाठवण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र याच कारागृहात यापूर्वी आर. केली आणि प्रसिद्ध रॅपर सीन ‘डिडी’ कॉम्ब्स यांसारखे गाजलेले कैदीही ठेवण्यात आले होते.
advertisement
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या MDC ब्रुकलिनमध्ये सध्या सुमारे 1,300 कैदी आहेत. मॅनहॅटन आणि ब्रुकलिनमधील फेडरल न्यायालयांत खटले सुरू असलेल्या आरोपींसाठी हे बहुतेक वेळा पहिले थांब्याचे ठिकाण असते. येथे कथित टोळी सदस्य, अंमली पदार्थ तस्कर, तसेच आर्थिक आणि ‘व्हाईट कॉलर’ गुन्ह्यांतील आरोपी ठेवले जातात, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, MDC ब्रुकलिनमध्ये ठेवले जाणारे मादुरो हे पहिले राष्ट्राध्यक्ष नाहीत. यापूर्वी होंडुरासचे माजी राष्ट्राध्यक्ष जुआन ऑरलॅंडो हर्नांडेझ यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. अमेरिकेत शेकडो टन कोकेन तस्करीप्रकरणी दोषी ठरल्यावर त्यांना 45 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र डिसेंबरमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना माफी दिली होती.
advertisement
सध्या या तुरुंगात मेक्सिकोच्या सिनालोआ ड्रग कार्टेलचा सहसंस्थापक इस्माइल ‘एल मायो’ झाम्बाडा गार्सिया, तसेच युनायटेडहेल्थकेअरच्या सीईओच्या हत्येप्रकरणातील आरोपी लुईगी मॅनजिओनी यांसारखे कैदीही आहेत. यापूर्वी क्रिप्टो उद्योजक सॅम बँकमॅन-फ्राइड आणि जेफ्री एपस्टीनची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल यांनाही येथे ठेवण्यात आले होते.
advertisement
समुद्रकिनाऱ्याजवळील औद्योगिक भागात, एका शॉपिंग मॉलच्या शेजारी आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जवळ दिसणाऱ्या या तुरुंगाला अनेकदा ‘नरकासारखा’ आणि ‘सतत सुरू असलेली शोकांतिका’ असे संबोधले गेले आहे. कैदी आणि त्यांचे वकील दीर्घकाळापासून हिंसाचाराच्या तक्रारी करत आहेत. 2024 मध्ये दोन कैद्यांची इतर कैद्यांकडून हत्या झाली होती. तसेच काही कारागृह कर्मचाऱ्यांवर लाच घेऊन प्रतिबंधित वस्तू आत पोहोचवल्याचे आरोपही झाले आहेत.
advertisement
2019 च्या हिवाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने हे कारागृह तब्बल एक आठवडा अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत होते. मात्र अलीकडच्या काळात फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्सने परिस्थिती सुधारल्याचा दावा केला आहे. अतिरिक्त सुरक्षारक्षक आणि वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आले असून, देखभालीशी संबंधित 700 हून अधिक तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वीज, पाणीपुरवठा, भोजन व्यवस्था तसेच हीटिंग आणि एअर कंडिशनिंग यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement









