advertisement

Shocking! वयाच्या 24 व्या वर्षी आली दाढी आणि तरुणाचा झाला मृत्यू, नेमकं घडलं काय?

Last Updated:
Man Died After Beard Transplant : एका 24 वर्षीय तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला दाढी नव्हती. त्याला दाढी आली आणि तीन महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला.
1/7
मुलं वयात येऊ लागली की त्यांना दाढीमिशा येऊ लागतात. पण एक मुलगा ज्याने वयाची विशी ओलांडली. तरी त्याला दाढी आली नाही. वयाच्या 24 व्या वर्षी त्याला दाढी आली, पण त्याचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

2/7
मॅथ्यू असं या तरुणाचं नाव. फ्रान्समध्ये राहणाऱ्या मॅथ्यूला दाढी येत नव्हती, त्यामुळे त्याला लाज वाटत होती. त्याने दाढी येण्यासाठी काय करावं यासाठी खूप काही काही शोधलं. शेवटी त्याला सर्जरीचा मार्ग सापडला.

3/7
दाढी येण्याची सर्जरी जी फ्रान्समध्ये महाग पण त्या तुलनेत इस्तंबूलमध्ये पाचपट स्वस्त असल्याचं त्याला समजलं. क्लिनिकच्या वेबसाइटवर तुर्की आरोग्य मंत्रालयाचा अधिकृत शिक्का पाहून त्याला खात्री पटली की ती खरी आहे. त्यामुळे तो मार्च 2025 मध्ये तुर्कीला गेला.

4/7
या प्रक्रियेसाठी सुमारे 1.13 लाख रुपये खर्च आला. या प्रक्रियेत मॅथ्यूच्या स्कॅल्पमधून 4000 ग्राफ्ट काढून ते त्याच्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट करण्यात आले. पण ही प्रक्रिया करणारा सर्जन पात्र डॉक्टर नव्हता, तो प्रॅक्टिस करणारा रिअल इस्टेट एजंट होता.

5/7
प्रक्रियेदरम्यान 1000 ग्राफ्ट हरवले किंवा खराब झाले. परिणामी त्याची दाढी पॅची, असमान आणि सांभाळता येणार नाही अशी होती. त्यानंतर संसर्ग, सूज आणि वेदना होऊ लागल्या.

6/7
मॅथ्यू फ्रान्सला परतल्यावर त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. तो नैराश्यात गेला आणि त्याचा आत्मविश्वास गमावला. त्याचे वडील जॅक यांनी सांगितलं की, माझा मुलाला खूप वेदना होत होत्या. त्याचा चेहरा विद्रूप झाला होता आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तो नैराश्य, लाजिरवाणेपणा आणि सतत वेदनांच्या दुष्ट चक्रात अडकला होता.

7/7
प्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यांनी जून 2025 मध्ये मॅथ्यूचा मृत्यू झाला. त्याचे वडील जॅक यांनी माध्यमांना सांगितलं की,
प्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यांनी जून 2025 मध्ये मॅथ्यूचा मृत्यू झाला. त्याचे वडील जॅक यांनी माध्यमांना सांगितलं की, "क्लिनिकने आम्हाला फसवले. तो डॉक्टर नव्हता, तर इस्टेट एजंट होता. म्हणूनच माझ्या मुलाचा मृत्यू झाला." (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement