My11Circle: पोरानं जिंकून दाखवलं! 49 रुपयांमध्ये विक्रम 3 कोटी कॅश आणि महिंद्राची Thar जिंकला!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आयपीएलच्या सिझनमध्ये मागील अनेक वर्षांपासून ड्रीम ११ आणि My-11Circle या फॅन्टसी अॅपवरून लोक पैसे जिंकत आहे. अशातच एका शेतकऱ्याच्या मुलाने तब्बल ३ कोटी आणि एक नवी कोरी महिंद्रा थार जिंकली आहे. तेही फक्त ४९ रुपयांमध्ये.
सध्या आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. एकीकडे मैदानात रणसंग्राम सुरू आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या फॅन्टसी अॅपवरून लोक करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे. आयपीएलच्या सिझनमध्ये मागील अनेक वर्षांपासून ड्रीम ११ आणि My-11Circle या फॅन्टसी अॅपवरून लोक पैसे जिंकत आहे. अशातच एका शेतकऱ्याच्या मुलाने तब्बल ३ कोटी आणि एक नवी कोरी महिंद्रा थार जिंकली आहे. तेही फक्त ४९ रुपयांमध्ये.
advertisement
हा नशीबवान विनर ठरला आहे हरियाणामधील करनाल येथील सुहाना गावातला. विक्रम असं या तरुणाचं नाव आहे. विक्रमची पत्नी रेखा ही गावाची सरपंच आहे. विक्रमने आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध लखनऊ सामन्यात माय ११ सर्कल या अॅपवर टीम लावली होती. विक्रमची टीम ही पहिली विनर टीम ठरली. त्याने ३ कोटी रोख आणि एक महिंद्रा थार जिंकली आहे.
advertisement
advertisement
advertisement
विक्रमने सांगितलं की, आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध लखनऊमध्ये मॅच झाली. 49 रुपयांमध्ये टीम लावली होती. My11Circle मध्ये पहिली टीम ज्याची जिंकेल त्याला ३ कोटी रोख आणि एक नवीन महिंद्रा थार पहिलं बक्षीस आहे. विक्रमने नेहमी प्रमाणे आपली टीम लावली आणि तो जिंकला. आता त्याच्या खात्यात ३ कोटी रुपये आले आहे. हा एक जुगाराचा प्रकार आहे, त्याच्या आहारी जाऊ नका, पण हौस म्हणून तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकतात, असं विक्रमचं म्हणणं आहे. विक्रम हा अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या अॅपवर आपलं नशीब आजमावत होता. त्याने याआधीही काही पैसे जिंकले होते.
advertisement
विक्रम हा मागील ५ वर्षांपासून या अॅपवर पैसे लावून टीम लावत होता. अखेर त्याने शेवटी ३ कोटी रुपये जिंकले आहे. या ३ कोटी रुपयांचं करायचं काय आहे, याचा आम्ही विचार केला नाही. पण आम्ही खूप खूश आहोत. इतके पैसे आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे. त्यामुळे काय करावं आम्हाला सूचत नाही. आम्ही शेती करून पोटं भरलं आता मुलाचं शिक्षण चांगलं करता येणार आहे, अशी प्रतिक्रिया विक्रमची पत्नी रेखा हिने दिली.
advertisement