Love and Pregnancy: 'लाज नाही वाटली का...' 28 वर्षांची तरुणी अल्पवयीन मुलाकडून राहिली गरोदर, घरासमोर...
- Published by:Sachin S
Last Updated:
एक २८ वर्षांची तरुणी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. हा मुलगा अल्पवयीन होता. या दोघांच्या प्रेमातून ही तरुणी आता गरोदर झाली
प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं. असं म्हणतात. त्यामुळे प्रेमात कोण कधी पडेल याचा नेम नाही. अलीकडे ६० पार झालेली माणसं सुद्धा तरुणींच्या प्रेमात पडल्याची उदाहरण आपण पाहिली असेल पण आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक २८ वर्षांची तरुणी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. हा मुलगा अल्पवयीन होता. या दोघांच्या प्रेमातून ही तरुणी आता गरोदर झाली आहे. आता लग्न करण्यासाठी तिने मुलाच्या घरासमोर तिने ठिय्या मांडला आहे. Photo Courtesy- Representative (Meta AI)
advertisement
ही घटना आहे पश्चिम बंगालमधील सागरपाडा येथील हरेकृष्णपूर परिसरात घडली आहे. सागरपाडा येथील हरेकृष्णपूर परिसरात साहेबनगर रायपाडा येथील एक तरुणी लग्नाच्या मागणीसाठी या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या घरासमोर ठिय्या मांडून बसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीचे यापूर्वीही लग्न झालं होतं आणि तिला २ वर्षांचा एक मुलगा देखिल आहे. पण त्यानंतरही ती १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. Photo Courtesy- Representative (Meta AI)
advertisement
advertisement
आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध हे एका वर्षांपासून सुरू आहे, आमचं लग्न सुद्धा झालं आहे. मी आता त्या अल्पवयीन मुलाची आई होणार आहे. असा दावाच या तरुणीने केला आहे. तर अल्पवयीन मुलाची आई कमालीची संतापली आहे. माझा मुलगा हा तिच्यापेक्षा खूप लहान आहे. त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवताना लाज नाही वाटली का? असा संतप्त सवाल अल्पवयीन मुलाच्या आईने या तरुणीला विचारला आहे. Photo Courtesy- Representative (Meta AI)
advertisement