General Knowledge : भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत मुख्यमंत्री कोण? संपत्ती-नाव दोन्ही वाचून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Rich and poor politicians in India : मोठमोठ्या बंगल्यांपासून ते आलिशान गाड्यांपर्यंत सर्व काही राजकारणांकडे असतं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतातील सगळ्यात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? किंवा सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असू शकतात?
advertisement
advertisement
advertisement
भारतात निवडणुकीपूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारांनी निवडणूक शपथपत्रात आपली मालमत्ता, उत्पन्नाचे स्त्रोत आणि कर्जाची माहिती सादर करावी लागते. जर कोणी नेत्याने चुकीची माहिती दिली किंवा आयकर रिटर्न आणि शपथपत्रातील माहितीमध्ये विसंगती आढळली, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
भारतातील सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?आपण नेहमीच ऐकतो की काही राज्यांचे मुख्यमंत्री खूप श्रीमंत आहेत. एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (332.57 कोटी रुपये) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (51.94 कोटी रुपये) चे मालक आहेत.
advertisement
advertisement
advertisement
त्यांच्या शपथपत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता फक्त 15.38 लाख रुपये आहे. त्यांच्या पाठोपाठ जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं नाव येतं. त्यांनी 55.24 लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले होते.
advertisement
संपत्तीपेक्षा साधेपणाला दिली महत्वममता बॅनर्जी यांची साधी राहणी आणि साधा जीवनशैली यामुळे त्या चर्चेत राहतात. प्रचंड राजकीय प्रभाव असूनही त्यांनी आपली राहणीमान साधी ठेवली आहे. आजच्या काळात, जेव्हा बहुतेक नेते आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात, तेव्हा ममता बॅनर्जी यांचं साधेपण खरंच प्रेरणादायी आहे. राजकारणात केवळ पैसाच नव्हे, तर साधेपणा आणि प्रामाणिकपणाही महत्वाचा असतो, हे त्या आपल्या आचरणातून दाखवून देतात.











