Toilet : रात्री 10 नंतर टॉयलेटमध्ये फ्लश करायला बंदी; केलं तर शिक्षा?

Last Updated:
Toilet Flush Ban : तुम्हाला विश्वास बसणार नाही टॉयलेट फ्लशिंगचा हा नियम आहे. आता असा नियम का बनवला आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 
1/5
टॉयलेटमध्ये गेलो की फ्लश करा, असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे फ्लश करायलाच तुम्हाला बंदी घातली तर... साहजिकच आश्चर्य वाटेल. असं ठिकाण जिथं रात्री 10 नंतर टॉयलेटमध्ये फ्लश करायला सक्त मनाई आहे.

advertisement
2/5
आता हे ठिकाण कोणतं, तर स्वित्झर्लंड, जे आरामदायी वातावरण आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. इथं रात्रीची शांतता इतकी असते की घरातील टॉयलेटच्या फ्लशचा आवाज शेजारच्या घरात जातो. त्यांना आवाजाचा त्रास होतो. याला लोक ध्वनी प्रदूषण मानतात.

3/5
टॉयलेट फ्लशचा हा नियम स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रीय किंवा सरकारी कायदा नाही. तर हा फक्त लोकांनी बनवलेला नियम आहे. विशेषत: घरमालकांनी भाडेकरूंसाठी करार करताना करारात या नियम टाकतात.

4/5
स्वित्झर्लंडमध्ये घरमालकांना त्यांच्या मालमत्तेसाठी नियम ठरवण्याचा अधिकार आहे, ज्याला हॉसोर्डनंग म्हणून ओळखलं जातं. हे नियम कचऱ्याच्या विल्हेवाटीपासून ते आवाजाची पातळी आणि विविध वर्तनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करतात. शौचालय फ्लशचा हा असाच एक नियम आहे जो काही घरमालक त्यांच्या करारांमध्ये समाविष्ट करतात.

5/5
हा नियम कायदेशीररित्या लागू नाही. पण भाडेकरू ते गांभीर्याने घेतात. कारण त्याचं उल्लंघन केल्याने घरमालक किंवा शेजाऱ्यांशी असलेले संबंध बिघडू शकतात. अडचणीत आणू शकतो.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement