दारू नेहमी काचेच्या ग्लासमध्येच का पितात? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दारू कोणतीही असो, ती पिण्यासाठी काचेचे ग्लास वापरले जातात. पण प्लास्टिक किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये दारू का घेतली जात नाही, यामागचं कारण काय आहे, ते जाणून घ्या...
advertisement
वाईन तज्ञांचे म्हणणे आहे की, स्टील किंवा प्लास्टिकच्या ग्लासात अल्कोहोल प्यायल्याने आरोग्याचे कोणतेही अतिरिक्त नुकसान होत नाही, पण या दोन्हीमध्ये अल्कोहोल पिणे आनंददायी नसते. याचे कारण म्हणजे मानवी इंद्रिये. तज्ञांचा असा विश्वास आहे की आपले डोळे अन्न आणि पेये यांची चव सर्वात आधी घेतात. याशिवाय, अल्कोहोलचा वास, सुगंध आणि स्पर्श अनुभवण्यासाठी इतर इंद्रिये काम करतात.
advertisement
advertisement
आता स्टील आणि प्लास्टिकच्या ग्लासात दारू पिण्याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की आपल्याला ती त्यात दिसत नाही आणि ग्लास एकमेकांना टच झाल्याची भावना निर्माण होत नाही. काचेचे ग्लास दारू पिणाऱ्याला अल्कोहोलचा रंग, पोत आणि पारदर्शकता जाणवण्याची भावना देतात. यामुळे मानसशास्त्रीय परिणाम वाढतो. काचेचे ग्लास अल्कोहोलचा सुगंध टिकवून ठेवतात.
advertisement
प्लास्टिकच्या ग्लासात अल्कोहोलचा वास आणि चव दोन्ही बदलल्यासारखे वाटते. त्यामुळे अनुभव बिघडतो. स्टीलच्या ग्लासात अल्कोहोलच्या तापमानावर परिणाम होतो, ज्यामुळे खरी चव जाणवत नाही. काचेच्या ग्लासात अल्कोहोल पिणे हे केवळ एक मानसशास्त्रीय कारण आहे. पण प्लास्टिक किंवा स्टीलच्या ग्लासात अल्कोहोल प्यायल्याने कोणतेही नुकसान होत नाही.