advertisement

गावी जाणं झालं सोपं! वेटिंग लिस्टचं टेन्शन विसरा, उन्हाळी हंगामात धावणार विशेष गाड्या, चेक करा वेळापत्रक

Last Updated:

सणासुदीचा हंगाम आणि येणाऱ्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच अनेक नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो आणि गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

उन्हाळी हंगामातील विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
उन्हाळी हंगामातील विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
पुणे: रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सणासुदीचा हंगाम आणि येणाऱ्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच अनेक नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो आणि गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे - कोल्हापूर - पुणे विशेष रेल्वे
रेल्वेकडून पुणे – कोल्हापूर – पुणे या दैनिक विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01023 पुणे ते कोल्हापूर विशेष ही रेल्वे 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर ते पुणे विशेष ही रेल्वे देखील 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
हडपसर - हरंगुल - हडपसर दैनिक विशेष रेल्वे
रेल्वेकडून हडपसर – हरंगुल – हडपसर या दैनिक विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01487 हडपसर ते हरंगुल विशेष ही रेल्वे 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01488 हरंगुल ते हडपसर विशेष ही रेल्वे देखील 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
सोलापूर-एलटीटी-सोलापूर साप्ताहिक विशेष रेल्वे
रेल्वेकडून सोलापूर – एलटीटी – सोलापूर या साप्ताहिक विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01435 सोलापूर ते एलटीटी विशेष (दर मंगळवारी) 3 मार्च ते 14 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01436 एलटीटी ते सोलापूर विशेष (दर बुधवारी) 4 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
सोलापूर - दौंड - सोलापूर दैनिक विशेष रेल्वे
रेल्वेकडून सोलापूर – दौंड – सोलापूर या दैनिक विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01461 सोलापूर ते दौंड विशेष ही रेल्वे 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01462 दौंड ते सोलापूर विशेष ही रेल्वे देखील 1 मार्च ते 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
या विशेष गाड्या त्यांच्या विद्यमान मार्ग, वेळापत्रक, रस्ता आणि थांब्यांसह चालवण्यात येणार आहेत. विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांसाठी बुकिंग 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल. प्रवाशांना ही तिकीटं सर्व पीआरएस स्थानकांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (www.irctc.co.in) बुक करता येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
गावी जाणं झालं सोपं! वेटिंग लिस्टचं टेन्शन विसरा, उन्हाळी हंगामात धावणार विशेष गाड्या, चेक करा वेळापत्रक
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement