जर्मनीच्या रस्त्यांवर पुणेरी ढोल ताशांचा गजर, पाहा कसा झाला गणेशोत्सव? Video

Last Updated:

जर्मनीतील महाराष्ट्रीयन बांधवांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. तसेच ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली.

+
जर्मनीच्या

जर्मनीच्या रस्त्यांवर पुणेरी ढोल ताशांचा गजर, पाहा कसा झाला गणेशोत्सव?

डोंबिवली, 24 सप्टेंबर: देश सोडून दुसऱ्या देशात गेले तरी भारतीय लोक प्रथा परंपरा विसरत नाहीत. सध्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. तसेच काहीसे वातावरण परदेशातील मराठी बांधवांत आहे. जर्मनीतील मराठी बांधवांनी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. तसेच आज मराठी मित्र मंडळातर्फे ढोल ताशांच्या गजरात गणरायाची जंगी विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी पारंपरिक मराठी संगीत आणि नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
परंपरा जपली
बाप्पा प्रत्येकालाच आनंद आणि उत्साह देतो. आपला देश सोडून दुसऱ्या देशात वास्तव्यासाठी गेलो तरी बाप्पा आशीर्वादाचा वर्षाव कुठूनही करत असतो. अशीच बाप्पाच्या भक्तांची धारणा असते. जर्मनी मधील डूसल्डॉर्फ या शहरात मराठी मित्र मंडळातर्फे बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच जल्लोषात बाप्पाचे विसर्जनही करण्यात येत आहे. मल्लखां चे प्रयोग, लेझिमचा ताल, ढोल ताशांच्या गजराने डूसल्डॉर्फ शहर दुमदुमले. रस्त्यावर चालण्यासाठी जागा देखील नाही, अशी माहिती मूळचे पुणेकर असणारे आणि सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेले ललित कुळकर्णी आणि अमृता कुळकर्णी यांनी दिली.
advertisement
रमणबाग ढोल ताशा पथक
रमणबाग हा पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ती शाळा असो किंवा ढोल ताशा पथक. पुणेकरांची पाऊले त्या रस्त्यावर काही क्षण का होईना रेंगाळतात. या क्षणांची आठवण कायम राहावी यासाठी मूळच्या पुणेकर असलेल्या काही ढोल ताशा पथकातील मंडळीनी तेथे वास्तव्य केले असले तरी रमण बाग या नावाने स्वतःचे ढोल ताशा पथक तयार केले आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाला रमणबाग ढोल ताशा पथक सज्ज झाले आहे.
advertisement
पोलिसांची परवानगी काढून मिरवणूक
जर्मनीत मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी काढावी लागते. त्यानंतर मिरवणूक काढणे शक्य होते. इतकेच नव्हे तर रविवार असल्याने विसर्जन करणे सोयीचे जाते. सर्वच मराठी मित्र मंडळीना यामध्ये सहभागी होता येते. त्यामुळे आमच्या बाप्पाचे आज विसर्जन करत असल्याची माहिती येथील आयोजक देतात. प्रसाद भालेराव यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अंकुश काणे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
जर्मनीच्या रस्त्यांवर पुणेरी ढोल ताशांचा गजर, पाहा कसा झाला गणेशोत्सव? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement