एक गाव एक नव्हे तर 11 गावांमध्ये आहे एकच गणपती! पाहा कुठं आहे ही परंपरा?

Last Updated:

एक गाव, एक गणपती ही कल्पना आपल्याला माहिती असेल पण महाराष्ट्रातील या अकरा गावांत एकच गणपती आहे.

+
एक

एक गाव एक नव्हे तर 11 गावांमध्ये आहे एकच गणपती! पाहा कुठं आहे ही परंपरा?

जालना, 23 सप्टेंबर: हल्ली मोठ मोठ्या गणेश मूर्ती, प्रचंड खर्चिक डेकोरेशन आणि डिजेचा गोंगाट हेच गणेश उत्सवाचे समीकरण झाले आहे. गणपती उत्सवादरम्यान होणारे मतभेद टाळण्यासाठीच 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना पुढे आली. मात्र जालना जिल्ह्यातील ओंकारेश्वर संस्थान केवळ एक गाव एक गणपती नव्हे तर अकरा गाव एक गणपती ही संकल्पना राबवत आहे. विशेष म्हणजे कोणताही मान अपमान गृहीत न धरता ही अकरा गावे मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात. अकरा गाव एक गणपती ही काय संकल्पना आहे. याबद्दल बालक गिरी बाबा यांनी माहिती दिली आहे.
ओंकारेश्वर संस्थानचा अनोखा उपक्रम
मंठा तालुक्यातील देवगाव खवने शिवारात असलेल्या ओंकारेश्वर संस्थान इथे हा अकरा गाव एक गणपती महोत्सव सुरू आहे. याठिकाणी अकरा गावातील भविकांबरोबरच इतर गावातील हजारो गणेश भक्तांची उपस्थिती असते. दररोज अनेक सामाजिक, संकसृतिक अन् अध्यात्मिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. विद्यार्थी इथे विविध सामाजिक विषयांवर नाटिका सादर करतात. तसेच आरोग्य शिबिर, वृक्ष लागवड असे सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतात. महाराष्ट्र राज्यात अकरा गाव एक गणपती हा एकमेव प्रयोग असल्याचे बालक गिरी बाबा यांनी सांगितले.
advertisement
महंतांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सव
अकरा गाव एक गणपतीची परंपरा ओंकारेश्वर आश्रम देवगाव (खवणे) या ठिकाणी गेल्या अकरा वर्षांपासून चालू आहे. यंदाचे वार्षिक गणेश महोत्सवाचे बारावे वर्ष आहे. देवगाव खवणे, आंबोरा, वैद्य वडगाव, गणेशपुर, वाघोडा, वरुड, माहोरा, पळसखेडा, टकलेपोकरी, पांडुरना आणि ब्रह्म वडगाव ही गावे या महोत्सवात सहभागी झाले आहेत. महंत भागवत गिरी महाराज हे या संस्थानचे मठाधिपती आहेत. महंत बालक गिरी महाराज हे सद्गुरू सेवागिरीजी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. दोन महंताच्या मार्गदर्शनाखाली हा वार्षिक गणेश महोत्सव साजरा केला जात आहे.
advertisement
गुरुकुल शिक्षणाची सोय
महंत बालक गिरी महाराज यांच्या अथक परिश्रमातून आणि परिसरातील सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी 'संस्कार प्रबोधिनी निवासी गुरुकुलाची स्थापना करण्यात आली आहे. निवासी गुरुकुलात 100 च्या पुढे इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निवासी विद्यालयात शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण दिल्या जाते. परिसरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी निवासी राहून शिक्षण घेतात. शिक्षण व संस्कार तसेच अध्यात्म यावर नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक विशेष प्रयत्न करतात.
advertisement
शालेय विद्यार्थ्यांना योग आणि अध्यात्मिक शिक्षण
मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योगाभ्यास, मैदानी खेळ या संदर्भात विद्यार्थ्यांना खेळाचे धडे दिले जातात. शालेय शिक्षणात संगीत, कला, वाद्यवादन कार्यानुभव, सेंद्रिय शेती, भाजीपाला या संदर्भातील शिक्षण देखील संस्कार प्रबोधिनी गुरुकुलात विद्यार्थ्यांना दिले जाते. वनराई बंधारे, वृक्षारोपण या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. गुरुकुलाचा सर्व परिसर घनदाट जंगलाने नटला असून निसर्गातील शाळा म्हणून या गुरुकुलाकडे पाहिले जात असल्याचे महंत बालक गिरी यांनी सांगितले.
मराठी बातम्या/अध्यात्म/
एक गाव एक नव्हे तर 11 गावांमध्ये आहे एकच गणपती! पाहा कुठं आहे ही परंपरा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement