हातावर रविराज नावाचा टॅटू, सात महिन्यांची गरोदर, इंदापुरात कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

Last Updated:

Crime in Indapur: बारामती-भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत एका पुलाखाली पाण्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. बारामती-भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत एका पुलाखाली पाण्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं आहे. अशा गरोदर महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत होता. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांदरम्यान असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हा प्रकार केवळ घातपात नसून, त्यामागे मोठे आणि गंभीर कारण असावं, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
advertisement

डाव्या हातावर 'रविराज' नावाचा टॅटू

मदनवाडी पुलाखाली ही घटना उघडकीस येताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, पोलिसांना मृत महिलेच्या डाव्या हातावर 'रविराज' (Raviraj) नावाचा टॅटू कोरलेला आढळला आहे. हा टॅटू महिलेची ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.
advertisement

पाच ते सहा दिवसांपूर्वी खून?

मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने, ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, हा खुनाचा प्रकार असल्याचं सांगितले आहे. खुनाची घटना दुसरीकडे घडवून नंतर मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भिगवण पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. महिलेची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन यांची कसून तपासणी केली जात आहे.
advertisement
तपास अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची ओळख पटल्यास या खुनामागील कारणे आणि आरोपींचा शोध घेणे सुलभ होईल. 'रविराज' नावाच्या टॅटूमार्फत ओळख पटवण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
हातावर रविराज नावाचा टॅटू, सात महिन्यांची गरोदर, इंदापुरात कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement