advertisement

'बांधकाम केलं तर ठार मारेल'; धमकी देत तरुणाला विहिरीत ढकललं, पुण्यात धक्कादायक घटना

Last Updated:

३३ वर्षीय फिर्यादी तरुणाच्या शेतात कंपाउंड घालण्याचे काम सुरू होते. बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी चारचाकी गाडीतून आला

तरुणाला विहिरीत ढकललं (AI Image)
तरुणाला विहिरीत ढकललं (AI Image)
पुणे : खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे बांधकामाच्या किरकोळ वादातून एका तरुणाला चक्क विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने, नातेवाईकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले असून, याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादाचे नेमके कारण काय? : मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय फिर्यादी तरुणाच्या शेतात कंपाउंड घालण्याचे काम सुरू होते. बुधवारी (२१ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी चारचाकी गाडीतून आला. "कोणाला विचारून कंपाउंड करत आहेस?" असा सवाल करत त्याने फिर्यादीशी वाद उकरून काढला.
फिर्यादी तरुण जेव्हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत होता, तेव्हा आरोपीने त्याला जोरात धक्का दिला. इतक्यावरच न थांबता आरोपीने लाकडी काठीने फिर्यादीच्या जबड्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर "थांब तुला ठारच मारतो," अशी धमकी देत आरोपीने या तरुणाला शेजारीच असलेल्या विहिरीत ढकलून दिले.
advertisement
विहिरीत पडल्यानंतर तरुणाने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखून तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढले. या भीषण हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला असून, त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
चाकण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'बांधकाम केलं तर ठार मारेल'; धमकी देत तरुणाला विहिरीत ढकललं, पुण्यात धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement