advertisement

पुणे हादरलं! 1 रुपयाच्या वादातून कोयत्याने छाटला हात, रक्ताच्या थारोळ्यातून पोलिसांनी पिशवीत भरला पंजा अन्...

Last Updated:

टपऱ्यांच्या चालकांमध्ये पदार्थांच्या दरावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एका २९ वर्षीय तरुणाचा हाताचा पंजा मनगटापासून वेगळा झाला आहे.

1 रुपयाच्या वादातून कोयत्याने छाटला हात (प्रतिकात्मक फोटो)
1 रुपयाच्या वादातून कोयत्याने छाटला हात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात किरकोळ वादातून गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महर्षीनगर येथील 'नादब्रह्म डोसा सेंटर'च्या शेजारी असलेल्या टपऱ्यांच्या चालकांमध्ये पदार्थांच्या दरावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एका २९ वर्षीय तरुणाचा हाताचा पंजा मनगटापासून वेगळा झाला आहे. तर, त्याच्या सोबतच्या एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.
प्रकरण काय?
प्रसाद अंदुरे (वय २९, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महर्षीनगर परिसरात दोन टपरी चालकांमध्ये मागील अनेक दिवसांपासून व्यवसायातील स्पर्धेतून वाद सुरू होते. सिलिंडरचे दर वाढलेले असतानाही, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक टपरी चालक दर कमी करत होता. तर दुसरा त्यापेक्षाही कमी दरात पदार्थ विकत होता. या दरांच्या स्पर्धेतून शुक्रवारी रात्री त्यांच्यात बाचाबाची झाली होती.
advertisement
शनिवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला. एका टपरी चालकाने आपल्या साथीदारांसह प्रसाद अंदुरे आणि त्याच्या सहकाऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रसादचा हाताचा पंजा छाटला गेला. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माणुसकी दाखवत पोलिसांनी तुटलेला पंजा एका प्लास्टिक पिशवीत भरून तातडीने ससून रुग्णालयात नेला. तिथे रात्री उशिरापर्यंत हा पंजा पुन्हा जोडण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू होती.
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! 1 रुपयाच्या वादातून कोयत्याने छाटला हात, रक्ताच्या थारोळ्यातून पोलिसांनी पिशवीत भरला पंजा अन्...
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement