Shrimant Dagdusheth Halwai Temple : 'ती' एक दु:खद घटना अन् गणपती उदयास आला, असा आहे पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा इतिहास

Last Updated:

Dagdusheth Ganpati Temple History : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि भाविकांचे अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते.पण या मंदिरामागचा खरा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

News18
News18
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव म्हटल्यावर सर्वप्रथम प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्यात बाहेरून आलेला एखादा व्यक्ती जर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला न गेला, तर त्याचा उत्सवाचा अनुभव अपूर्ण समजला जातो. हा उत्सव फक्त सण म्हणून नव्हे, तर समाजाच्या योगदानातून सामाजिक उपक्रमांसाठी महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमुळेही प्रसिद्ध आहे, ज्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान जगभर ओळखले जाते. चला, आता या गणपतीच्या स्थापनेच्या इतिहासाकडे एक नजर टाकूया.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली, कोणत्या उद्देशाने केली गेली, हे जाणून घेणे अत्यंत रंजक आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. श्रीमंत असले तरीही दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो. समाजातील अनेक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रसिद्ध आहे.
advertisement
ऐतिहासिक माहिती येथे वाचा
पूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. त्यांचे वास्तव्य बुधवार पेठेतील दत्त मंदिर जवळ होते. त्या काळात पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांचा मुलगा मृत्यूमुखी पडला, ज्यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई खचून गेले. या वेळी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज यांनी त्यांना आधार देत, दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून पूजा करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, ''जसे आपल्या अपत्यांनी आपल्या माता-पित्यांचे नाव उज्वल करते, तसाच हा दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील.''
advertisement
शिवाय महाराजांच्या सल्ल्यानुसार दगडूशेठ यांनी दत्ताची संगमरवरी मूर्ती आणि गणपतीची मातीची मूर्ती तयार केली. या गणपतीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली, ज्यावेळी परिसरातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या, जसे की बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, सरदार परांजपे इत्यादी. गणपतीची ही पहिली मूर्ती आजही शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आहे.
advertisement
1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली, तर 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार झाली आणि उत्सव सुरू झाला. पुढे परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे चालवली. सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी गणपतीची जबाबदारी घेतली.
advertisement
advertisement
1896 साली तयार केलेल्या मूर्तीची काहीशी जीर्ण अवस्था पाहता 1967 मध्ये अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नवीन मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला गेला. 1968 मध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडे लहान मातीची मूर्तीचा नमुना तयार करून घेतला. मूर्ती पूर्वीच्या मूर्तीप्रमाणेच असल्याचे निश्चित झाल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत विधीपूर्वक पूजा केली, गणेश यंत्राची विधीपूर्वक आराधना करून सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटात ठेवले. त्या काळी नवीन मूर्ती तयार करण्याचा खर्च 1,125 रुपये झाला.
advertisement
या प्रकारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने केवळ पुण्यातच नाही तर जगभरात आपल्या श्रद्धास्थानाचा अमूल्य ठसा उमटवला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shrimant Dagdusheth Halwai Temple : 'ती' एक दु:खद घटना अन् गणपती उदयास आला, असा आहे पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा इतिहास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement