advertisement

गॅस सिलिंडरच्या नियमात बदल, OTP शिवाय सिलिंडर मिळणार नाही, पुणे प्रशासनाकडून ९६ तासांचा अल्टीमेटम

Last Updated:

बऱ्याचदा गॅस डिलिव्हरी बॉय घरी आल्यावर ग्राहक नसतील किंवा घाई असेल तर ओटीपीशिवाय सिलिंडर दिला जायचा. पण आता तसं चालणार नाही.

LPG Gas
LPG Gas
गॅस सिलिंडरसाठी एजन्सीबाहेर तासनतास रांगा लावणाऱ्या आणि डिलिव्हरीसाठी आठवडाभर वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जिल्ह्यातील गॅस वितरणाचा विस्कळीत झालेला गाडा रुळावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावलं उचलली आहेत. या नव्या नियमांमुळे ग्राहकांची धावपळ थांबणार असली, तरी काही जुन्या सवयींना मोडावं लागणार आहे.
OTP शिवाय सिलिंडर नाही
बऱ्याचदा गॅस डिलिव्हरी बॉय घरी आल्यावर ग्राहक नसतील किंवा घाई असेल तर ओटीपीशिवाय सिलिंडर दिला जायचा. पण आता तसं चालणार नाही. घरपोच डिलिव्हरी करताना OTP दिल्याशिवाय सिलिंडर देता येणार नाही. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, गॅस एजन्सी किंवा गोदामांवर जाऊन सिलिंडर आणण्याची पद्धत आता इतिहास जमा होणार आहे. सिलिंडर हवाय ना? मग घरी थांबा, असाच इशारा जणू प्रशासनाने दिला आहे. एजन्सीसमोर होणारी मोठी गर्दी आणि तिथून होणारी बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
९६ तासांचा अल्टिमेटम
बुकिंग केल्यानंतर अनेक दिवस सिलिंडर येत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस जिल्हाधिकारी कार्यालयात पडला होता. त्याची दखल घेत आता गॅस कंपन्यांना ९६ तासांच्या आत डिलिव्हरी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच, सिलिंडरचा साठा करून ठेवणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी 'वेटिंग पिरियड ठरवून दिला आहे. आता शहरात २५ दिवस आधी तुम्हाला दुसरा सिलिंडर मिळणार नाही. हिंजवडीसारख्या आयटी हबमध्येही हाच नियम लागू असेल.
advertisement
E KYC बंधनकारक
सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी 'बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन' (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेकदा अशा कामांसाठी एजन्सीबाहेर तासनतास उभं राहावं लागतं, पण यावेळी सरकारने दिलासा दिला आहे. ग्राहकांना आता त्यांच्या घरात आरामात हे काम पूर्ण करता येईल. यासाठी तुम्हाला फक्त संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीचे (उदा. Indane, HP, Bharat Gas) अधिकृत मोबाईल ॲप आणि Aadhaar FaceRD हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
advertisement
प्रशासनाने केवळ नियमच केले नाहीत, तर धाकही निर्माण केला आहे. गॅस वितरणात कोणी अडथळा आणला किंवा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, तर थेट पोलीस तक्रार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एजन्सींवरही आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
गॅस सिलिंडरच्या नियमात बदल, OTP शिवाय सिलिंडर मिळणार नाही, पुणे प्रशासनाकडून ९६ तासांचा अल्टीमेटम
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement