Pune Land Scam : निलेश घायवळनंतर शीतल तेजवानीने दिल्या पुणे पोलिसांच्या हातावर तुरी? नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय!

Last Updated:

Parth Pawar Land Scam Pune Sheetal Tejawani : मुख्य संशयित शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे.

Sheetal Tejawani not reachable-2025-11-2f0b7d68ed1ba140729e21f15b10e2f2
Sheetal Tejawani not reachable-2025-11-2f0b7d68ed1ba140729e21f15b10e2f2
Parth Pawar Land Scam : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील (Digvijay Patil) हे दोघे भागीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याचबरोबर अमेडिया प्रायव्हेट लिमिटे या कंपनीच्या मार्फत व्यव्हार सुरू असल्याचं समोर आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. अशातच आता शीतल तेजवानी यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आलीये.

मुख्य संशयित शीतल तेजवानी फरार?

प्रकरणात जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असताना आता मुख्य संशयित शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. ती आपल्या पतीसह देशाबाहेर पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन्ही नवरा आणि बायको राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही.
advertisement

निलेश घायवळप्रमाणे हातावर तुरी दिल्या?

शीतल तेजवानीचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून, यापूर्वी तिने सेवा विकास बँकेला 41 कोटींचा घोटाळा केला होता. तिचा पती सागर सुर्यवंशीसोबत तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे दहा कर्जे घेतली आणि त्यांचा गैरवापर केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई करत सुमारे 45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे शीतलने देखील निलेश घायवळप्रमाणे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

दहा बनावट कर्ज

दरम्यान, सेवा विकास बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सागर सूर्यवंशीला काही दिवसांपूर्वी सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून अटक झाली होती. तर शीतल अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी झाली होती. त्यामुळे केवळ कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणातच नव्हे तर बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणातही शीतल तेजवाणी मुख्य आरोपी असल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी शीतल तेजवाणी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांनी द सेवा विकास बँकेच्या विविध शांखांमधून दहा बनावट कर्ज घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Land Scam : निलेश घायवळनंतर शीतल तेजवानीने दिल्या पुणे पोलिसांच्या हातावर तुरी? नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement