advertisement

Nagpur Crime : बोर्डाच्या पेपरला जात होती अन् वाटेतच मृत्यूने गाठलं, वडिलांसमोर 12 वीच्या विद्यार्थीनीने तडफडून सोडला जीव!

Last Updated:

Nagpur Crime Accident News : विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला.

Nagpur 12th student dies in Accident
Nagpur 12th student dies in Accident
Nagpur Crime News : राज्यभरात 12 वीच्या बोर्डाचे पेपर सुरू आहेत. एकीकडे कॉप्यांचा सुळसुळाट सुरू असताना दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली, ज्यामध्ये 12 वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मोहपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवणकर हे आपली मुलगी तन्वी आणि तिची मैत्रीण वंशिका नरुळे यांना घेऊन दुचाकीने उमरेडमधील परीक्षा केंद्राकडे जात होते. मात्र, वाटेतच काळाने घाला घातल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळी 10:30 च्या सुमारास...

उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ हा अपघात सकाळी 10:30 च्या सुमारास झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. यामध्ये सुभाष भिवणकर आणि तन्वी यांचा घटनास्थळीच अंत झाला, तर वंशिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement

ट्रकच्या केबिनला लावली आग

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आणि परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर याला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर संतापलेल्या जमावाने ट्रकच्या केबिनला आग लावून आपला रोष व्यक्त केला. एका तरुण विद्यार्थिनीचा परीक्षेला जातानाच असा अंत झाल्याने संपूर्ण मोहपा गावात शोककळा पसरली आहे.
advertisement

पोलीस गाड्यांवर दगडफेक

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उमरेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून ट्रक चालकाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. मात्र, यावेळी संतप्त जमावाने पोलीस गाड्यांवर दगडफेक केली, ज्यामुळे सरकारी वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी कसाबसा जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
advertisement

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, बारावीच्या बोर्ड परीक्षेचा उत्साह असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आपल्या पोटच्या मुलीला करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर साथ देण्यासाठी निघालेल्या वडिलांचा आणि मुलीचा असा मृत्यू होणे हे समाजासाठी चटका लावणारे ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Crime : बोर्डाच्या पेपरला जात होती अन् वाटेतच मृत्यूने गाठलं, वडिलांसमोर 12 वीच्या विद्यार्थीनीने तडफडून सोडला जीव!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement