पिंपरीत खळबळ! महापालिकेच्या आरक्षणात ऐनवेळी बदल, नवा ट्विस्ट; उमेदवार संतापले
- Published by:Prachi Amale
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
निवडणूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे.
पुणे : सदोष मतदार याद्या, मतदारांची दुबार नोंदणी अशा अनेक कारणामुळे आधीच अडचणीत आलेल्या निवडणूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडती जाहीर केल्यानंतर आता शहरातील दोन प्रभागातील आरक्षणे पुन्हा बदलण्यात आल्याची माहिती,निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलीय.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्रमांक 19 आणि 30 मधील आरक्षण बदलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये जाहीर केलेल्या आरक्षणात जिथे ओबीसी प्रवर्गात पुरुषासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती, तिथे आता महिलांसाठी राखीव केल्या गेल्याच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आरक्षणात ज्या जागेसाठी सर्वसाधारण असं आरक्षण टाकल्या गेलं होतं.
advertisement
तिथे बदल करून आता सर्वसाधारण महिला,असा बदल करण्यात आल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
मात्र आयोगाकडून करण्यात आलेला हे बदल अन्यायकारक आणि राजकीय दबावापोटी केल्या गेल्याचा आरोप करत इच्छुक उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागेसाठी 32 प्रभागात एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र, महापालिकेच्या आरक्षण सोडतीत नागरिकाच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षण करताना शासनाच्या 20 मे 2025 रोजीच्या आदेशान्वये नियम क्रं.6(3)(ब) नूसार ज्या प्रभागात अनुसूचित जाती, जमाती जागा आरक्षित आहेत. परंतु, त्या जागा त्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित न झाल्यास नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्गाची जागा थेट ओबीसी महिलासाठी आरक्षित करणे आवश्यक असतानाही,प्रभाग क्रमांक 30 या ठिकाणची जागा अशा प्रकारे थेट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला आरक्षित करण्यात आली नाही. किंबहुना आरक्षण सोडती काढणाऱ्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आलीच नाही
advertisement
तर दुसरीकडे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांच्या सोडतीत सर्वात शेवटी उचलण्यात आलेली जागा, प्रभाग क्रमांक 19 ब ची चिठ्ठी रद्द करण्यात आली. त्या ऐवजी आता नियमातील तरतुदीनूसार थेट देय असलेल्या जागा प्रभाग क्रमांक 30 क येथे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 ब आणि प्रभाग क्रमांक 30 क आरक्षणात फेरबदल करण्यात आले असून याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण फेरबदल करुन नव्या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला मंजुरी दिली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलाय.
advertisement
दरम्यान आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 128 जागा पैकी एससी 20, एसटी 3 जागेनंतर ओबीसीसाठी 35 जागा आणि खुल्या गटातील 35 जागांवर महिलांचे असे आरक्षण अंतिम झाले होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागेनूसार प्रभागातील आरक्षण जाहीर झाल्याचं मान्य करत एकूण 128 जागांसाठी नव्या इच्छुकांसह माजी नगरसेवक मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती.
advertisement
मात्र, आता अचानक प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मधील आरक्षणात फेरबदल झाल्याने येथील इच्छुक उमेदवारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आरक्षणात फेरबदल कसा झाला?
पूर्वीचे आरक्षण सोडत प्रभाग क्रमांक 19
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
नव्याने बदलण्यात आलेले आरक्षण
advertisement
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
-------------------
पूर्वीचे आरक्षण प्रभाग क्रमांक 30
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
ड – सर्वसाधारण
नव्याने पडलेले आरक्षण
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
advertisement
क – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ड – सर्वसाधारण
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 18, 2025 8:53 PM IST


