12 राज्यातील महिला बचत गट, 325 स्टॉल, पुण्यातील भीमथडी जत्रेला सुरुवात, यंदा काय आहे खास?

Last Updated:

Bhimthadi Jatra 2024: पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात भीमथडी जत्रा भरली आहे. यामध्ये 12 राज्यांतील महिला बचत गट आणि उद्योजक सहभागी झाले आहेत.

+
12

12 राज्यातील महिला बचत गट, 325 स्टॉल, पुण्यातील भीमथडी जत्रेला सुरुवात, यंदा काय आहे खास?

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांसाठी यंदा खास पर्वणी आहे. राज्यातील कला-संस्कृतीचे प्रदर्शन आणि महिला बचत गटांना आर्थिक ताकद देणारी भीमथडी जत्रा भरली आहे. पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात ही जत्रा भरली असून राज्यातील 18 पेक्षा जास्त जिल्ह्यांसह देशातील 12 राज्यांमधून महिला बचत गट व महिला उद्योजिक आले आहेत. त्यांच्यासाठी 325 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील महिला उत्पादकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून ही जत्रा गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी भरवली जातेय. लोकल18 च्या माध्यमातून भीमथडी जत्रेबाबत जाणून घेऊ.
advertisement
भीमथडी जत्रेचे यंदाचे हे 18 वे वर्ष आहे. या जत्रेत दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची कलासंस्कृती गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, नंदीबैल पुणेकरांना अनुभवायला मिळतात. भीमथडी यात्रा ही 5 दिवस असणार आहे. 20 डिसेंंबरला सुरू झालेली यात्रा 25 डिसेंबरपर्यंत पुणेकरांना अनुभवता येईल. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत ही यात्रा सुरू असते.
ग्रामीण खाद्य महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेले उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य आदींसह हस्तकला उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा, बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई आदी भरड धान्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
याशिवाय खाद्य विभागात खापरावरील पुरण पोळी, खान्देशी मांडे, जळगावच्या वांग्याचे भरीत, मासवडी, उकडीचे मोदक, विदर्भाची स्पेशल लंबी रोटी व वडा भात, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी फिश थाळी, राशिनचे सुप्रसिद्ध मटन, चिकन व मटन वडे असे विविध खाद्य पदार्थ पाहायला मिळतात. तर हस्तकलेच्या अनेक आकर्षक वस्तू देखील या ठिकाणी खरेदी करता येतात. यंदा ही जत्रा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
12 राज्यातील महिला बचत गट, 325 स्टॉल, पुण्यातील भीमथडी जत्रेला सुरुवात, यंदा काय आहे खास?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement