एस एस राजामौलींचा RRR आता ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये, केव्हा होणार रिलीज
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्यानंतर चाहत्यांना RRR चित्रपट ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. याविषयीची माहिती दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिली आहे.
ऑस्करमध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरल्यानंतर आता RRR चित्रपट आणखी एका नव्या व्हर्जनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. RRR चित्रपट ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्यानंतर चाहत्यांना RRR चित्रपट एका वेगळ्याच व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या ॲनिमेटेड कामाला सुरूवात करण्यात आलेली आहे.
एसएस राजामौली यांनी दिलेल्या माहितीनुसार, RRR चे संपूर्ण जग आता ॲनिमेटेड असणार आहे. RRR चित्रपटाच्या ॲनिमेटेड व्हर्जनवर काम सुरू झाले आहे. अद्याप घोषणाच झाली असून चित्रपटाच्या एडिटिंगसाठी सुरूवात झालेली नाही. प्रेक्षकांमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण आहे. खरंतर, ॲनिमेटेड चित्रपटांची सर्वात जास्त क्रेझ तरुणाईंमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. RRR ॲनिमेची कल्पना मूळ चित्रपटाची कथा नवीन स्वरूपात सादर करण्यासाठी, विशेषतः तरुण प्रेक्षकांसाठी आणि अॅनिमेशन प्रेमींसाठी एक मोठे पाऊल म्हणून पाहिली जाते.
advertisement
1920 सालातली कथा आहे. स्वातंत्र्य लढ्यामागील मैत्री आणि प्रेरणेभोवती फिरणारी आरआरआरची कथा, त्याच्या मूळ चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या प्रभावित करते. पण आता, हिच कथा ॲनिमेशन स्वरूपात सादर केल्याने, ती केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या नवीन पिढीला आकर्षित करेल. राजामौली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲनिमेशन चित्रपटाची कथा ही कल्पनाशक्तीच्या फार वेगळी असते. त्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक आऊट ऑफ बॉक्स विचार करू शकतो. शक्य नसणारी गोष्ट ही ॲनिमेटेड चित्रपटात शक्य होते.
advertisement
अद्याप RRR ॲनिमी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फक्त सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिकेतील जोडीने चित्रपटाला आधीच एक वेगळी ओळख दिली आहे. आता ही जोडी ॲनिमेटेड व्हर्जनमध्येही चाहत्यांची मने जिंकू शकते. राजामौलींच्या या कृतीवरून हे स्पष्ट होते की ते आरआरआरला फक्त एका चित्रपटापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाहीत, तर ते जागतिक ब्रँडमध्ये विकसित करू इच्छितात. चित्रपटाने जगभरात 1,200 कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 4:42 PM IST








