पुणेकर तरुणांची साहसी मोहीम, समुद्र किनाऱ्याच्या अवघड सुळक्यावर यशस्वी चढाई

Last Updated:

Mountaineering: पुण्यातील तरुणांनी रत्नागिरीतील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सुळक्यावर यशस्वी चढाई केलीये.

+
पुणेकर

पुणेकर तरुणांची साहसी मोहीम, समुद्र किनाऱ्याच्या सुळक्यावर यशस्वी चढाई

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे: आपण आयुष्यात वेगळं काही तरी करावं असं प्रत्येकाची इच्छा असते. पुण्यातील प्रसिध्द गिर्यारोहक टीम एस. एल. एडवेंचर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधे अनेक यशस्वी साहसी मोहिमा झाल्या आहेत. यावेळी या टीमने कोकणातील समुद्रकिनारपट्टी जवळ असणारा एकमेव सुळका सर करण्याचे ठरवले. समुद्र किनारपट्टीजवळील खडक, जोराने धडकणाऱ्या लाटा, तसेच दमट वातावरण, ठिसूळ खडक यामुळे ही मोहीम नैसर्गिक दृष्ट्या जोखमीची मानली जाते. अनेक संकटांवर मात करत या टीमने यशस्वी चढाई केली असून लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
एस. एल. एडवेंचर ही टीम गेली 11 वर्षांपासून गिर्यरोहण क्षेत्रात कार्यरत आहे.  या टीम मध्ये 32 हून अधिक लोक सहभागी आहेत. तर सह्याद्री पर्वत रांगांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त ट्रेक केले आहेत. आतापर्यंत 60 हून अधिक सुळक्यांवर चढाई केल्या असून यासोबत महाराष्ट्रामधे अनेक यशस्वी साहसी मोहिमा झाल्या आहेत. ह्यूमन आणि ऍनिमल रेस्क्यूसाठी देखील टीम काम करते. यामुळे एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं जात आहे.
advertisement
रत्नागिरी येथील सुळ्या सुळाका हा समुद्र किनारी असणारा भारतातील एकमेव आहे. तेथील दमट वातावरण, लाटा, वारा आणि समुद्राला येणारी भरती ओहोटी यामुळे तो थोडा आव्हानात्मक आहे. या टीममध्ये आम्ही 13 जण होतो.120 फूट उंच हा सुळका आहे. यामध्ये 6 वर्षाचा एक मुलगा असून त्याने आता पर्यंत 10 ट्रेक हे केले आहेत. तर यापुढे ही असेच वेगवेगळे ट्रेक करत राहणार असल्याची भावना गिर्यारोहक लहू उघडे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर तरुणांची साहसी मोहीम, समुद्र किनाऱ्याच्या अवघड सुळक्यावर यशस्वी चढाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement