Christmas Shopping: ख्रिसमससाठी करायची खरेदी? पुण्यात इथं मिळतात सगळ्यात स्वस्त वस्तू, किंमत फक्त...
- Published by:sachin Salve
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Christmas Shopping in Pune: पुण्यातील शुक्रवार पेठ मार्केट मध्ये ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, मॅजिक बॉल, गोल्डन सिल्व्हर स्टार सांता कॅप,तरुणांसाठी सांता ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
पुणे : वर्षाच्या शेवटी येणारा सण म्हणजे ख्रिसमस. ख्रिस्ती बांधवांसोबतच अन्य धर्मीय सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सगळीकडेच बाजारपेठांमध्ये सध्या नाताळच्या शॉपिंगसाठी गर्दी दिसते. ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज, सजावटीचं सामान आणि गोडधोड पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग असते. पुण्यातील शुक्रवार पेठ मार्केट मध्ये ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, मॅजिक बॉल, गोल्डन सिल्व्हर स्टार सांता कॅप,तरुणांसाठी सांता ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
पुण्यातील शुक्रवार पेठ इथे असलेलं आर. एन. बांगड हे 85 वर्ष जुनं दुकान असून इथे ख्रिसमस साठी लागणारे विविध वस्तू या मिळतात. तर ख्रिसमसला अवघे काही दिवस उरले आहेत.बाजारपेठही सज्ज झाली आहे. ख्रिसमसच्या भेटवस्तू, सांताक्लॉज, स्नोमॅन, टेडी बेअरसह अनेक भेटवस्तूंनी दुकाने सजली आहेत. ख्रिसमस ट्री आणि संगीतमय सांताला खूप मागणी असलेली पाहिला मिळत आहे.
advertisement
ट्रीला सजवण्यासाठीच सामान पेपर स्टार, रिंग्स, इतर पॅकेज लूज सामान, स्नो मॅन, सांताक्लॉज या सारख्या बराच वस्तू या मिळतात आणि याची किंमत ही 20 रुपयांपासून सुरू होते. तर ट्रीची किंमत ही 40 रुपयांपासून सुरू होते 2 हजार रुपये पर्यंत आहेत. स्नो, पाईन ट्री प्रकार असून यामध्ये कलर आणि नॉर्मल ही पाहिला मिळतात. छोटा सांता, टेबल ट्री,कलर फुल बॉल,चेरी पॅटर्न, बेल्स पॅटर्न या सारख्या बऱ्याच वस्तू असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी देखील आहे. अशी माहिती विक्रेते विकास कांबळे यांनी दिली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 19, 2024 10:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Christmas Shopping: ख्रिसमससाठी करायची खरेदी? पुण्यात इथं मिळतात सगळ्यात स्वस्त वस्तू, किंमत फक्त...