Pune Yerawada Crime : येरवड्यात मोठा राडा! कोयत्याने हाणामारी, पोलिसांना सतत फोन लावला पण... पाहा CCTV Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Yerawada Rada Video : घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिसांना वारंवार कॉल करूनही पोलीस मदत उशिरा पोहोचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Pune Yerawada Rada Video : मागील आठवड्यात पुण्यातील येरवडा परिसरात घरात घुसून दामपत्याला कोयत्याने मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. अशातच आता पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर आर.के. चौकात धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर आर.के. चौक भागात मध्यरात्री उशिरा दोन गटांमध्ये उघडपणे झालेली फाइटिंग, दगडफेक आणि कोयत्यांची हाणामारी यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार कॉल करूनही पोलीस मदत उशिरा
मध्यरात्रीच्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात गुन्हेगारांनी उघडपणे कोयते हवेत फिरवत दहशत माजवली. त्यामुळे आता या गुन्हेगारांवर कारवाई कधी केली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिसांना वारंवार कॉल करूनही पोलीस मदत उशिरा पोहोचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
advertisement
पाहा Video
पुण्यातील येरवड्यात उघडपणे हाणामारी, परिसरात दहशतीचं वातावरण, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल (लिंक कमेंटमध्ये...) pic.twitter.com/QBzFJKZagZ
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2025
येरवड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
काही दिवसांपूर्वीच एका महिलेला आणि तिच्या मुलाला घरात घुसून मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा अशी हाणामारी झाल्यामुळे येरवड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. मुलांना घराबाहेर पाठवण्यात पालक घाबरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
advertisement
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात...
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळ्यांविरोधात कारवाईची घोषणा केली आहे. फक्त व्यक्तींना अटक करणे हेच शेवटचे उद्दिष्ट नाही. त्या लोकांचे संपूर्ण ‘इकोसिस्टम’ लक्षात घेऊन तोच नष्ट करणे हे पोलिस दलाचे काम आहे, असे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं होतं. याआधी 'जे लोकं कायद्याच्या विरुद्ध बाजूने चालणारे आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नियमात आणि कायद्यात चालावं नाहीतर आमची काठी आहेच... तसेच, शहरात कोणतीही आपत्तीजनक घटना होऊ देऊ नये', असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Yerawada Crime : येरवड्यात मोठा राडा! कोयत्याने हाणामारी, पोलिसांना सतत फोन लावला पण... पाहा CCTV Video