घरात घुसून झोपलेल्या तरुणीच्या जवळ गेला अन्...पुण्यात भरदिवसा खळबळजनक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपीने तरुणीच्या पायाला स्पर्श केला आणि "मी तुझ्यासाठीच आलो आहे," असे म्हणत तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर आरोपीने तरुणीच्या गालाला आणि तोंडाला स्पर्श करून अश्लील चाळे केले
पुणे: पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा एका तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या एका २२ वर्षीय नराधमाला काळेपडळ पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. सलमान मुराद सय्यद (वय २२, रा. कडनगर चौक, महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. २१ वर्षीय पीडित तरुणी आपल्या घरात झोपलेली असताना, आरोपी सलमान सय्यद याने चोर पावलांनी घरात प्रवेश केला. तरुणी गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने तिच्या जवळ जाऊन अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली.
advertisement
आरोपीने तरुणीच्या पायाला स्पर्श केला आणि "मी तुझ्यासाठीच आलो आहे," असे म्हणत तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर आरोपीने तरुणीच्या गालाला आणि तोंडाला स्पर्श करून अश्लील चाळे केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने प्रसंगावधान राखत याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून काळेपडळ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी सलमान सय्यदला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरदिवसा घरात घुसून अशा प्रकारे कृत्य करण्याच्या धाडसामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 1:53 PM IST









