पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं, दरवाजा उघडताच पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली

Last Updated:

National Defence Academy Pune : पोलिसांनी सध्या विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबालाही देण्यात आली आहे.

Pune Crime News 18 year old Cadets Body
Pune Crime News 18 year old Cadets Body
Pune Crime News (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defence Academy - NDA) मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरिक्ष कुमार असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे, अंतरिक्षने आज पहाटे आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे आता पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंतरिक्ष कुमार याने आज पहाटे त्याच्या खोलीतील बेडशीटचा वापर करून गळफास (hanging) घेतला. याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एनडीए कॅम्पसमध्ये धाव घेतली. पोलिसांनी सध्या विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबालाही देण्यात आली आहे. अंतरिक्ष मूळचा उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) रहिवासी होता.
advertisement

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

अंतरिक्ष कुमार याने याच वर्षी जुलै महिन्यात एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या (Suicide) केली, याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

NDA आहे काय?

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला NDA म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय सशस्त्र सेवांसाठी एक अकादमी आहे जी खडकवासला, पुणे येथे आहे. पुणे दौऱ्याचा भाग म्हणून इतिहासप्रेमींसाठी ही एक सर्वोत्तम ठिकाण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी संयुक्त सेवा अकादमी म्हणून काम करते जिथे कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या तीन प्रमुख शाखांसाठी प्रशिक्षण दिले जाते. NDA मध्ये त्यांचा वेळ घालवल्यानंतर, कॅडेट्स त्यांच्या संबंधित सेवा अकादमींमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षणासाठी पुढे जातात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं, दरवाजा उघडताच पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement