advertisement

पुणेकरांनो घराबाहेर पडताना सावधान; रस्त्यावर महिलांसोबत घडतोय धक्कादायक प्रकार; सिंहगड रोड अन् विश्रांतवाडीत घटना

Last Updated:

पुणे शहरात दागिने हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सिंहगड रोड आणि विश्रांतवाडी या दोन वेगवेगळ्या भागात महिलांना लक्ष करून त्यांचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद (AI Image)
पुण्यात चोरट्यांचा उच्छाद (AI Image)
पुणे: पुणे शहरात पादचारी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सिंहगड रोड आणि विश्रांतवाडी या दोन वेगवेगळ्या भागात महिलांना लक्ष करून त्यांचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंहगड रोड: भरदुपारी मंगळसूत्र लंपास
पहिली घटना सिंहगड रोड परिसरातील सनसिटी रस्त्यावर घडली. येथील एका सोसायटीत राहणाऱ्या ५६ वर्षीय महिला गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी कामानिमित्त बाहेर निघाल्या होत्या. सनसिटी रस्त्यावरून पायी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा करेपर्यंत चोरटे वेगाने पसार झाले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
विश्रांतवाडी: भाजी मंडईत ज्येष्ठ महिलेला लुटले
दुसरी घटना विश्रांतवाडीतील आळंदी रस्ता परिसरात घडली. येथे भाजी मंडईत आपल्या सुनेसोबत खरेदीसाठी आलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. मात्र, या प्रकरणात विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून मुकेश बाबुलाल राठोड (वय २२, रा. नागपूर) या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
शहरात भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी देखील महिला सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून दिसत आहे. विशेषतः पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिला चोरट्यांच्या 'सॉफ्ट टार्गेट' ठरत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो घराबाहेर पडताना सावधान; रस्त्यावर महिलांसोबत घडतोय धक्कादायक प्रकार; सिंहगड रोड अन् विश्रांतवाडीत घटना
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement