वेगळा देश, वेगळा धर्म, वयात अंतर; हे खूप वेदनादायी! निक जोनाससोबत घटस्फोटाबाबत प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Priyanka Chopra Nick Jonas Divorce : वाराणसी फिल्म्समधून प्रियांका चोप्रा भारतीय सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे, याचदरम्यान एका मुलाखतीत तिने निक जोनासशी घटस्फोटाबाबतही सांगितलं आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सिंगर निक जोनास यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली. तरी त्यांच्या घटस्फोटांबाबत सतत चर्चा होत असते. सध्या प्रियांका 'वाराणसी' फिल्ममधून भारतीय सिनेसृष्टीत परत येत असल्याने चर्चेत आली आहे. याचदरम्यान तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही गोष्टी सांगितल्यात. खासकरू निकसोबत तिच्या रिलेशनशिपबाबत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
"मला माहित नाही की आम्ही असं काय केलं ज्यामुळे लोक आमच्या नात्याबद्दल इतके नाराज झाले. कदाचित आम्ही वेगवेगळ्या देशांचे आहोत, वेगवेगळ्या धर्मांचे आहोत आणि वयाचा फरक आहे म्हणून. हे सर्व खूप वेदनादायी होतं", असं तिने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना सांगितलं. पण आता प्रियांका-निक यांना त्यांच्या नात्याभोवती होणाऱ्या चर्चांचा त्रास होत नाही. ते दोघं एकमेकांमध्ये मग्न असतात.










