advertisement

पुण्यात पबमध्ये पार्टी, मध्यरात्री पार्किंगमधील कारमध्येच झोपले दोन मित्र, पहाटे डोळे उघडताच ते दृश्य पाहून बसला धक्का

Last Updated:

मध्यरात्री दोनच्या सुमारास पबमधून बाहेर पडल्यानंतर, थकव्यामुळे हे दोघेही मित्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आपल्या कारमध्येच झोपले.

कारमध्ये झोपलेल्या दोघांसोबत अजब घटना (AI Image)
कारमध्ये झोपलेल्या दोघांसोबत अजब घटना (AI Image)
पुणे : पुण्यातील पब संस्कृती आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे स्टेशन परिसरातील एका नामांकित पबच्या पार्किंगमध्ये गाडीत झोपलेल्या महाविद्यालयीन तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तरुणाच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची साखळी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
नेमकी घटना काय?
बावधन परिसरात राहणारा एक महाविद्यालयीन युवक ३१ जानेवारी रोजी रात्री आपल्या मित्रासह पुणे स्टेशन भागातील एका पबमध्ये पार्टीसाठी गेला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास पबमधून बाहेर पडल्यानंतर, थकव्यामुळे हे दोघेही मित्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आपल्या कारमध्येच झोपले. हीच संधी साधून चोरट्याने त्यांच्यावर डल्ला मारला.
बाऊन्सरवर संशयाची सुई
पहाटे जेव्हा या तरुणांना जाग आली, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. तक्रारदाराच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी गायब होती, तर त्याच्या मित्राच्या खिशातील ६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल देखील चोरीला गेला होता. याप्रकरणी पीडित तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीत पबच्याच एका अनोळखी बाऊन्सरचा हात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
advertisement
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
पबच्या पार्किंगसारख्या ठिकाणी जिथे सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक असतात, तिथेच अशा प्रकारे लूट होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पबमध्ये पार्टी, मध्यरात्री पार्किंगमधील कारमध्येच झोपले दोन मित्र, पहाटे डोळे उघडताच ते दृश्य पाहून बसला धक्का
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement