advertisement

Pune: बुधवार पेठेनंतर पुण्यात पुन्हा मोठी कारवाई, आता हडपसरचं मसाज पार्लर, काय घडलं?

Last Updated:

Pune News: बुधवार पेठ येथील कॉम्बिंग ऑपरेशननंतर पुण्यात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

Pune: बुधवार पेठेनंतर पुण्यात पुन्हा मोठी कारवाई, आता हडपसरचं मसाज पार्लर, काय घडलं?
Pune: बुधवार पेठेनंतर पुण्यात पुन्हा मोठी कारवाई, आता हडपसरचं मसाज पार्लर, काय घडलं?
पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार पुढे आला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता पोलिसांनी हडपसर भागात कारवाई केली. आता एका मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला असून मोठं कांड समोर आलंय. मसाज पार्लरच्या आडून अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्यानं पोलिसांनी व्यवस्थापकालाच अटक केली.
पुण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाला मसाज पार्लरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत संबंधित मसाज पार्लरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून तीन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
advertisement
मसाज पार्लरच्या नावाखाली...
हडपसर येथील वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या गाडीतळ परिसरात हा अवैध प्रकार सुरू होता. हडपसर येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळील व्हाईट पर्ल स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाचा उपयोग करून खातरजमा करत या स्पा मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला. यात पार्लरचा व्यवस्थापक सौरभ इंगळे याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांचे आवाहन...
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले होते. वर्दळीच्या ठिकाणी सुरू झालेल्या या अवैध प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा कुठल्याही गैरप्रकाराची माहिती आढळल्यास नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशाल चव्हाण, तुषार भिवरकर व दताराम जाधव यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: बुधवार पेठेनंतर पुण्यात पुन्हा मोठी कारवाई, आता हडपसरचं मसाज पार्लर, काय घडलं?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement