Pune Crime : हडपसरमध्ये 'डिजिटल कुलूप' उघडून चोरट्यांचा धुमाकूळ, अमनोरा पार्क टाऊनमध्ये 26 लाखांची चोरी! CCTV मध्ये काय दिसलं?

Last Updated:

Pune Hadapsar Crime : रविवारी दुपारी 3 वाजता ते घरी परतले असता, दरवाज्याचे डिजिटल कुलूप उघडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Pune Hadapsar Crime Thieves opening digital lock theft worth 26 lakhs
Pune Hadapsar Crime Thieves opening digital lock theft worth 26 lakhs
Pune Crime News : पुण्यातील हडपसर परिसरातील अमनोरा पार्क टाऊन हा हायफाय एरिया म्हणून ओळखला जातो. पण याच अमनोरा पार्क टाऊन येथे एका घरातून 26 लाख 67 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याला लावलेले डिजिटल कुलूप उघडून ही चोरी केली. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल कुलूप उघडलं...

ही घटना मागील शनिवारी (11 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. येथील 33 वर्षीय तक्रारदार कुटुंबासह सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी 3 वाजता ते घरी परतले असता, दरवाज्याचे डिजिटल कुलूप उघडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घरात तपासणी केली. तेव्हा घरी चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
advertisement

सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले

तपासणीदरम्यान, शयनगृहातील पलंगामध्ये ठेवलेले 26 लाख 67 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे घाबरलेल्या तक्रारदारांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या उपनिरीक्षक हसन मुलाणी या चोरीच्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. CCTV मध्ये माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जातोय.
advertisement

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

दरम्यान, पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात पहाटेच वाहनचोरांनी धाडस चोरी करत गावातील सरपंचाची आलिशान टोयोटा फॉर्च्युनर (MH 12 TH 9955) पळवून नेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण चोरीची घटना जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना कोरेगाव भीमा-पुणे नगर रोडवरील यशराज टॉवर परिसरात गुरुवारी 16 तारखेला पहाटेच्या पहाटेच्या सुमारास घडली होती.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : हडपसरमध्ये 'डिजिटल कुलूप' उघडून चोरट्यांचा धुमाकूळ, अमनोरा पार्क टाऊनमध्ये 26 लाखांची चोरी! CCTV मध्ये काय दिसलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement