'स्टडी व्हिसिट'साठी गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य तणावादरम्यान पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातील त्या 80 विद्यार्थ्यांबाबत मोठी अपडेट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हे सर्व विद्यार्थी एका विशेष 'स्टडी व्हिजिट'साठी (अभ्यास दौऱ्यासाठी) दुबईला गेले होते. नियोजित वेळापत्रकानुसार, हे विद्यार्थी शनिवारी आणि रविवारी दोन टप्प्यांत भारतात परतणार होते.
पुणे: मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या भीषण युद्धजन्य परिस्थितीचा फटका पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ताथवडे येथील नामांकित 'इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल ऑफ बिझनेस' चे ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक, असे एकूण ८४ जण सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला आहे.
अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते विद्यार्थी
हे सर्व विद्यार्थी एका विशेष 'स्टडी व्हिजिट'साठी (अभ्यास दौऱ्यासाठी) दुबईला गेले होते. नियोजित वेळापत्रकानुसार, हे विद्यार्थी शनिवारी आणि रविवारी दोन टप्प्यांत भारतात परतणार होते. मात्र, आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, परिणामी या विद्यार्थ्यांना तेथेच थांबावे लागले आहे.
सर्व विद्यार्थी सुरक्षित
महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व ८० विद्यार्थी आणि शिक्षक दुबईच्या मध्य भागात असून पूर्णपणे सुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनी किंवा कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. दुबईतील भारतीय दूतावासातील अधिकारी या विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सक्रिय झाले आहे. हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत होताच या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने किंवा उपलब्ध मार्गाने मायदेशी आणले जाईल. जर हवाई मार्ग उघडण्यास विलंब झाला, तर भारतीय दूतावासाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'स्टडी व्हिसिट'साठी गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य तणावादरम्यान पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातील त्या 80 विद्यार्थ्यांबाबत मोठी अपडेट








