Recipe Video : डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता झटपट पुरणपोळी; इतकी सोपी रेसिपी कुठे मिळणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Make Puran Poli : होळीसाठी पुरणपोळी बनवण्याची अशी पद्धत तुम्ही आजवर पाहिली नसेल. अशीही पुरणपोळी बनवता येऊ शकते, असा विचारही तुम्ही केला नसेल. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, व्वा पुरणपोळी बनवणं इतकं सोपं आहे? चला पाहुयात कशी बनवायची पुरणपोळी?
कोणताही भारतीय सण असो, त्या सणादिवशी एक खास पदार्थ बनतो. आता आली ती होळी, यादिवशी पुरणपोळी बनवली जाते. म्हणून होळीच्या दिवशी, होळी रे होळी पुरणाची पोळी असं ओरडतही फिरतात. पुरणपोळी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. पण पुरणपोळी बनवणं म्हणजे अनेकांना कठीण वाटतं. पुरणपोळी बनवण्याची पद्धत किचकट वाटते, पुरणपोळी बनवताना अनेक समस्या येतात. पण आता डोंट वरी. आम्ही तुमच्यासाठी पुरणपोळी बनवण्याची एकदम सोपी पद्धत घेऊन आलो आहोत.
पुरणपोळी बनवायची म्हणजे पीठ मळणं, पुरणं वाटणं आलंच. इथं चुकलात तरी पुरणपोळी फसते. किंबहुना पुरणपोळी बनवण्याची प्रत्येक स्टेप नीट फॉलो करायला हवी. एक जरी स्टेप चुकली तरी पुरणपोळी फसते. पण आम्ही तुम्हाला डाळ न शिजवता, पीठ न मळता, पुरण न वाटता पुरणपोळी बनवण्याची पद्धत दाखवणार आहोत. बरं सामान्यपणे पुरणपोळी बनवण्यासाठी जितका वेळ जातो, तितका वेळही लागणार नाही. अगदी काही मिनिटांत तुमची पुरणपोळी बनेल.
advertisement
झटपट आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. युट्यूबवर असलेल्या अशाच काही व्हिडीओपैकी मोजके व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं प्रमुख साहित्य चणाडाळ किंवा बेसन गूळ किंवा साखर मैदा किंवा गव्हाचं पीठ वेलची पूड तेल किंवा तूप खाली दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या वेगवेगळ्या रेसिपी व्हिडीओमध्ये साहित्य आणि त्याचं योग्य प्रमाणही देण्यात आलं आहे.
advertisement
पुरण न वाटता पुरणपोळी कशी बनवायची?
डाळ न शिजवता, पुरण न वाटता पुरणपोळी कशी बनवायची?
advertisement
डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता पुरणपोळी कशी बनवायची?
आता यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने पुरणपोळी बनवून पाहा आणि कशी झाली ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या ओळखीतल्या लोकांना ही बातमी शेअर करून त्यांनाही सोप्या पुरणपोळीची रेसिपी द्यायला विसरू नका.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 10:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Recipe Video : डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता झटपट पुरणपोळी; इतकी सोपी रेसिपी कुठे मिळणार नाही









