advertisement

Black Dosa Recipe Video : नागपुरात मिळतो काळा डोसा, पण बनवतात कसा? सीक्रेट रेसिपी

Last Updated:

Nagpur Black Dosa Recipe Video : आजवर तुम्ही साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे खाल्ले असतील, पण कधी काळा डोसा खाल्ला आहे का? याचा रेसिपी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
डोसा म्हणजे थोडा पांढरा, थोडा ब्राऊन असा असतो. डोसा करपला तर तो मध्यभागी किंचित काळा दिसतो. पण तुम्ही पूर्ण काळा डोसा कधी पाहिला आहे का? काळा डोसा वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हा काळा डोसा बनवतात तरी कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
सोशल मीडियावर काळा डोसाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. माहितीनुसार नागपुरातील एका हॉटेलमध्ये हा ब्लॅक डोसा मिळतो. काळा डोसा म्हणजे तुम्हाला डोसा करपवत असतील असं वाटतं असेल. पण तसं बिलकुल नाही. आता डोसा करपवला तर तो कडू लागणार आणि काळा होण्याइतपत डोसा करपवून तो खाण्यायोग्यही राहणार नाही. मग काळा डोसा बनवायचा कसा?
advertisement
आम्ही काळा डोशाची रेसिपी इंटरनेटवर सर्च करून तुमच्यासाठी आणली आहे. सामान्य डोशाच्या पिठात एक एक सीक्रेट इंग्रेडिएंट टाकायचा आहे, ज्यामुळे हा ब्लॅक डोसा तयार होतो. आता तो इंग्रिडिएंट काय आहे ते पाहुयात.
advertisement
advertisement
1 कप डोशाच्या पिठाच्या प्रमाणानुसार ही रेसिपी पाहू. 1 कप डोशाचं पीठ बनवण्यासाठी  अर्धा कप उडीद डाळ, दीड कप तांदूळ, एक टिस्पून मेथी आणि मीठ घ्या. सगळं भिजवून, वाटून आंबवून पीठ तयार करा. हे झालं सामान्य डोशाचं पांढरंशुभ्र पीठ तयार. आता याचा काळा डोसा कसा बनवणार, तर यात या डोशाच्या पिठात तुम्हाला टाकायचं आहे, अक्टिवेटेड कार्बन. 2 कप डोसा पिठासाठी 1 टेबलस्पून अॅक्टिवेटेड कार्बन टाकून ते नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर जसं सामान्यपणे डोसा बनवला जातो, तसाच तो बनवा. साधा डोसा, मसाला टाकून मसाला डोसा आणि डोशाचे इतर प्रकार.
advertisement
ज्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तिथं अॅक्टिवेटेड कार्बनचे फायदेही सांगण्यात आले आहेत. यामध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरिअल,  अँटिफंगल, डिटॉक्सिफाइंग घटक असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, नको असलेले विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यात किडनीच्या कार्यात मदत होते, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
advertisement
तुम्ही कधी हा काळा डोसा पाहिला किंवा खाल्ला आहे का? तर कसा वाटला? आणि नाही खाल्ला तर तुम्हाला हा डोसा खायला आवडेल का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Black Dosa Recipe Video : नागपुरात मिळतो काळा डोसा, पण बनवतात कसा? सीक्रेट रेसिपी
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement