advertisement

आधी कॅन्सरचं नाटक, मग लग्नाचं आमिष! तरुणीचं प्रतिकसोबत मोठं कांड, पुण्यातील सराफ व्यावसायिकानं दुकानातच संपवलं आयुष्य

Last Updated:

श्रेयाने स्वतःला कॅन्सर (कर्करोग) झाल्याचे खोटे सांगून प्रतीकची सहानुभूती मिळवली होती. आजारपण ठाऊक असूनही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता.

गर्लफ्रेंडकडून फसवणूक, तरुणाचा टोकाचं पाऊल (प्रतिकात्मक फोटो)
गर्लफ्रेंडकडून फसवणूक, तरुणाचा टोकाचं पाऊल (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: फुरसुंगी येथील 29 वर्षीय सराफ व्यावसायिक प्रतीक राजेंद्र मेमाणे यांनी आपल्या राहत्या घराजवळील दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून झालेली आर्थिक आणि मानसिक फसवणूक सहन न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रतीकचे वडील राजेंद्र मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रेया नावाच्या तरुणीविरोधात हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना आणि फसवणुकीचा प्रकार:
प्रतीक आणि श्रेया यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. श्रेयाने प्रतीकला लग्नाचे आश्वासन देऊन त्याचा विश्वास संपादन केला होता. या काळात प्रतीकने तिला ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, महागडे कपडे आणि अनेक भेटवस्तू दिल्या होत्या.
'कॅन्सर'चे खोटे नाटक
तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, श्रेयाने स्वतःला कॅन्सर (कर्करोग) झाल्याचे खोटे सांगून प्रतीकची सहानुभूती मिळवली होती. आजारपण ठाऊक असूनही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. मात्र श्रेया वारंवार भेटी टाळून त्याला मानसिक त्रास देत होती. या सततच्या तणावामुळे आणि फसवणुकीच्या भावनेमुळे प्रतीकने ६ मार्च रोजी आपले जीवन संपवले.
advertisement
१६ पानांच्या सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा
आत्महत्येपूर्वी प्रतीकने १६ पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने श्रेयाने केलेली फसवणूक, भेटवस्तूंची मागणी आणि मानसिक छळ याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सुसाईड नोटमधील मजकूर आणि वडिलांच्या तक्रारीनंतर आता याला गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आधी कॅन्सरचं नाटक, मग लग्नाचं आमिष! तरुणीचं प्रतिकसोबत मोठं कांड, पुण्यातील सराफ व्यावसायिकानं दुकानातच संपवलं आयुष्य
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement