advertisement

Pune Crime: पुण्यातील ते घनदाट जंगल अन् ओढणी बांधून झाडाला लटकवलेला महिलेचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर

Last Updated:

दोघेही सोळू येथील निर्जन जंगलात गेले असता, विष्णूने अचानक पार्वतीचा गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर पकडलं जाऊ नये म्हणून विष्णूने अतिशय चलाखीनं पुरावा नष्ट करण्याचा कट रचला

जंगलात आढळला महिलेचा मृतदेह (AI Image)
जंगलात आढळला महिलेचा मृतदेह (AI Image)
पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील सोळू परिसरातून एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. एकत्र कामावर जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच ओळखीच्या महिलेचा गळा आवळून निर्घृण खून केला. केवळ खून करूनच तो थांबला नाही, तर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी त्याने मृतदेह झाडाला लटकवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आळंदी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव अवघ्या काही तासांत उघड झाला आहे.
नेमकी घटना काय?
पार्वती दराडे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित विष्णू महादेव पावडे (वय ३२, मूळ रा. परभणी) याला अटक केली आहे. पार्वती आणि विष्णू हे दोघेही ओळखीचे असून एकाच ठिकाणी कामाला होते. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दुपारी दोघेही नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले.
जंगल गाठलं अन् काटा काढला
दोघेही सोळू येथील निर्जन जंगलात गेले असता, विष्णूने अचानक पार्वतीचा गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर पकडलं जाऊ नये म्हणून विष्णूने अतिशय चलाखीनं पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. त्यानं पार्वतीच्या गळ्यातील ओढणी आणि स्कार्फच्या साहाय्याने त्यांचा मृतदेह एका झाडाला बांधून लटकवला. जेणेकरून, ही आत्महत्या आहे असा लोकांचा आणि पोलिसांचा समज व्हावा.
advertisement
पोलिसांनी असा उघड केला बनाव
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशी सुरू केली. तपासाची चक्रे फिरताच विष्णू पावडे याचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली असून, खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यातील ते घनदाट जंगल अन् ओढणी बांधून झाडाला लटकवलेला महिलेचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement