Pune Raid: रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने खिडकीतून मारली उडी, महिला जागेवर गेली; विमाननगर हादरलं
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Pune Spa Raid: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली.
पुणे : पुणे शहारतील विमाननगर परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानगर येथील Roots Spa मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी अचानक धाड टाकताच निर्माण झालेल्या गोंधळात एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमाननगर परिसरात असलेल्या Roots या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून स्पा सेंटरवर छापा टाकला. अचानक पोलिस आल्याचे लक्षात येताच स्पा सेंटरमध्ये एकच धावपळ उडाली. या गोंधळाच्या वातावरणात एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली.
advertisement
नेमकं काय घडलं?
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर स्पा मॅनेजर गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ परिसर सील करून पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच, स्पा सेंटरमध्ये नेमका कोणता प्रकार सुरू होता, याचा सखोल तपास केला जात आहे.
advertisement
विमानगर परिसरात एकच खळबळ
या घटनेमुळे विमानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील स्पा सेंटर आणि मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही पुणे शहरात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये अनैतिक व्यवसायाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, पोलिस कारवाईदरम्यान थेट मृत्यू होण्याची घटना गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
advertisement
दोषींवर कठोर कारवाई करणार
दरम्यान, मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 9:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Raid: रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने खिडकीतून मारली उडी, महिला जागेवर गेली; विमाननगर हादरलं






