advertisement

Ranveer Singh: 'फक्त बॉलिवूड स्टार आहात म्हणून...', 'कांतारा' प्रकरणात रणवीर सिंगला हायकोर्टाचा झटका; उद्या होणार फैसला!

Last Updated:
Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आहे. 'कांतारा' चित्रपटातील दैव पात्राची नक्कल करणे रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे.
1/9
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आहे. 'कांतारा' चित्रपटातील दैव पात्राची नक्कल करणे रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी दाखल झालेला एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

2/9
नोव्हेंबर २०२५ मध्ये गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) रणवीर सिंगने 'कांतारा' फेम अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याच्या उपस्थितीत चित्रपटातील एका विशिष्ट दृश्याची नक्कल केली होती. दैव पात्राचे हावभाव करताना रणवीरने त्याला 'फिमेल घोस्ट' असं म्हटलं होतं.

3/9
ही नक्कल कोस्टल कर्नाटकातील पवित्र 'भूत कोला' आणि 'दैव' परंपरेचा अपमान करणारी असल्याचा आरोप करत बेंगळुरूचे वकील प्रशांत मेथल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
ही नक्कल कोस्टल कर्नाटकातील पवित्र 'भूत कोला' आणि 'दैव' परंपरेचा अपमान करणारी असल्याचा आरोप करत बेंगळुरूचे वकील प्रशांत मेथल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
advertisement
4/9
रणवीरच्या वकिलांनी आज कोर्टात असा युक्तिवाद केला की,
रणवीरच्या वकिलांनी आज कोर्टात असा युक्तिवाद केला की, "रणवीरने हे केवळ चित्रपटाचा चाहता म्हणून आणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी केले होते. त्याच्या मनात कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, या साध्या गोष्टीला मुद्दाम गुन्हेगारी रंग दिला जात आहे."
advertisement
5/9
मात्र, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रणवीरला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही तर,
मात्र, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रणवीरला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही तर, "केवळ तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून तुम्हाला झुकतं माप मिळणार नाही," अशा कडक शब्दांत न्यायालयाने रणवीरच्या वकिलांना फटकारले आहे.
advertisement
6/9
रणवीरच्या वकिलांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. यावर जस्टिस एम. नागप्रसन्ना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,
रणवीरच्या वकिलांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. यावर जस्टिस एम. नागप्रसन्ना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "प्रकरण तातडीने ऐकण्यासाठी काय कारण आहे? केवळ ते बॉलीवूड स्टार आहेत म्हणून? उद्या जर एखादा हॉलिवूड स्टार आला तर आपण घड्याळाच्या काट्यावर धावणार का?"
advertisement
7/9
न्यायालयाने स्पष्ट केलं की, प्रत्येक आरोपीला कायद्यासमोर समान वागणूक दिली जाईल आणि कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट मिळणार नाही.
न्यायालयाने स्पष्ट केलं की, प्रत्येक आरोपीला कायद्यासमोर समान वागणूक दिली जाईल आणि कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट मिळणार नाही.
advertisement
8/9
रणवीर सिंग विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ (धार्मिक तेढ निर्माण करणे), २९९ (धार्मिक अपमान) आणि ३०२ (सार्वजनिक खोडसाळपणा) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
रणवीर सिंग विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ (धार्मिक तेढ निर्माण करणे), २९९ (धार्मिक अपमान) आणि ३०२ (सार्वजनिक खोडसाळपणा) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
advertisement
9/9
रणवीरने यापूर्वी सोशल मीडियावर माफी मागितली असली, तरी कायदेशीर कचाट्यातून त्याची अद्याप सुटका झालेली नाही. आता उद्या, २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत हायकोर्ट एफआयआर रद्द करणार की रणवीरच्या अडचणी वाढणार, याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement