Pune News : आयुष कोमकरच्या हत्येच्या 41 दिवसानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांनी 10 वा आसूड ओढला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Police Action On Bandu Andekar : बंडू आंदेकर हा आयुष कोमकर हत्याप्रकरणी अटकेत असून तो जेलमध्ये आहे. बंडू आंदेकर टोळीवर आतापर्यंत 10 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत.
Pune Police registered case against Bandu Andekar : पुण्यातील कुप्रसिद्ध गँगस्टर आणि आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह तिघांवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम नगर परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
10 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल
सध्या बंडू आंदेकर हा आयुष कोमकर हत्याप्रकरणी अटकेत असून तो जेलमध्ये आहे. बंडू आंदेकर टोळीवर आतापर्यंत 10 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आंदेकर टोळीकडून पीडित असलेल्या सर्व नागरिकांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केलं आहे. अशातच आता बंडू आंदेकरची कुंडली समोर आली असून पुणे पोलीस कारवाईचा तडाखा लावत आहेत.
advertisement
मासळी बाजारावर कारवाई
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस प्रशासनाने कुख्यात बंडू आंदेकर याच्या अवैध साम्राज्यावर निर्णायक हल्ला चढवला होता. त्याचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या नागझरी नाल्यावरील बेकायदा मासळी बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली होती. मासळी बाजारची अधिकृत इमारत उपलब्ध असूनही, आंदेकरच्या वरदहस्ताने नाल्यावर अतिक्रमण करून हा बाजार अनेक वर्षांपासून चालवला जात होता.
advertisement
115 जणांवर गुन्ह्याची नोंद
नाना पेठेतील वनराज आंदेकर याच्या नावानं असलेल्या प्रवेशद्वारवर कारवाई करून ते हटवण्यात आलं. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळी मागील 12 वर्षांपासून पुण्यातील गणेश पेठ फिश मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांना धमकावून आणि दहशतीनं खंडणी वसूल करत होती. याप्रकरणी बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिलांसह 115 जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. र्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीचा मागील 13 वर्षांपासून दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावानं खंडणी उकळण्याचा व्यवसाय उघड केलाय. याप्रकरणी फारसखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 9:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : आयुष कोमकरच्या हत्येच्या 41 दिवसानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांनी 10 वा आसूड ओढला!