advertisement

पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत नको ते कृत्य, 73 वर्षीय आरोपीला 10 वर्षांनी मिळाली 'ही' शिक्षा

Last Updated:

तब्बल दहा वर्षांपूर्वी चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या न्यायालयाने ७३ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवलं आहे

ट्रेनमध्ये विनयभंग (AI Image)
ट्रेनमध्ये विनयभंग (AI Image)
पुणे: तब्बल दहा वर्षांपूर्वी चालत्या ट्रेनमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या न्यायालयाने ७३ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवलं आहे. यात वृद्धाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नेमकी घटना काय होती?
ही घटना २०१६ मध्ये घडली होती. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसह उच्च शिक्षणासाठी तळेगाव ते कासारवाडी या मार्गावर ट्रेनमध्ये प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान आरोपी रमेश सदोरमल केसवानी (वय ७३, रा. पिंपरी) याने तरुणीचा विनयभंग केला होता. या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केले होते.
advertisement
केस न्यायालयात १० वर्षे चालली
ही केस न्यायालयात १० वर्षे चालली. इतका मोठा कालावधी लोटल्याने फिर्यादी आणि साक्षीदारांच्या आठवणी धूसर झाल्या होत्या. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी हार मानली नाही. सरकारी वकील अश्विनी काळे यांनी सात महत्त्वाचे साक्षीदार तपासले आणि ठोस तांत्रिक पुरावे सादर केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमरदीप साळुंके आणि पथकाने या केसचा सातत्याने पाठपुरावा केला.
advertisement
न्यायालयाचा निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. जे. चव्हाण यांनी आरोपी रमेश केसवानी याला दोषी ठरवले. त्याला सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि त्यांच्या टीमने केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांना कडक संदेश मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत नको ते कृत्य, 73 वर्षीय आरोपीला 10 वर्षांनी मिळाली 'ही' शिक्षा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement