Pranjal Khewalkar: 'महिलांसोबत तसले व्हिडीओ गुपचूप बनवले', प्रांजल खेवलकरांवर चाकणकरांचा आणखी एक आरोप, गुन्हा दाखल
- Published by:Sachin S
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पुणे: पुण्यातील हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरण आता अधिकच गंभीर होत चाललंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. रेव्ह पार्टीत अटकेनंतर आता आयटी अॅक्टअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेसोबतच्या शारीरिक संबंधांचे गुपचूप व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे.
पुण्यातील खराडीतील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. या घरातून कोकेन, गांजा, दारू, हुक्का आणि अश्लील साहित्य जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी “माल पाहिजे का?” असा सोशल मीडियावरील संवादही पुरावा म्हणून जप्त केला होता. या प्रकरणात खेवलकर अजून न्यायालयीन कोठडीत आहेत तोपर्यंत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांच्या मते, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये १,४९७ फोटो आणि २५२ व्हिडीओ सापडले आहेत. यापैकी २३४ फोटो आणि १९ व्हिडीओ अत्यंत अश्लील असून काहींमध्ये परप्रांतीय महिलांचा आणि मोलकरणींचा समावेश आहे.
advertisement
नवीन कारवाईत, खेवलकरवर आयटी अॅक्टअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी महिलेसोबतच्या शारिरिक संबंधांचे गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करून ते जतन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे केवळ अश्लीलता नव्हे, तर सायबर गुन्ह्यांचं स्वरूपही स्पष्ट होतंय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 15, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pranjal Khewalkar: 'महिलांसोबत तसले व्हिडीओ गुपचूप बनवले', प्रांजल खेवलकरांवर चाकणकरांचा आणखी एक आरोप, गुन्हा दाखल