Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या भागात जलसंकट?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Pune Water Cut: येत्या शुक्रवारी लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.
येत्या शुक्रवारी 26 डिसेंबर 2025 रोजी लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे रामटेकडी टाकीच्या अखत्यारीतील भागाचा शुक्रवार 26 डिसेंबर 2025 ते शनिवार 27 डिसेंबर 2025 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार रोजी 27 डिसेंबर 2025 रात्रीपर्यंत पाणी पुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे. तरी सर्व पुणेकरांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र भाग:- संपूर्ण हडपसर, हडपसर गावठाण, ससाणे नगर, रेल्वे लाईन कडेचा भाग, मंत्री मार्केट, गंगा रेसिडेन्सी, साईनाथ वसाहत, गाडीतळ, चिंतामणी नगर, सय्यदनगर, हडपसर इंड्रस्ट्रीयल इस्टेट, शिंदेवस्ती, भीमनगर, संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, आनंदनगर, एस.आर.पी.एफ. महंमदवाडी गाव, तरवडेवस्ती, कृष्णानगर, सातवनगर, राजीव गांधीनगर, दोराबजी पॅराडाईज, कडनगर बुस्टरवरील भाग, तुकाई दर्शन टाकी सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर व काळेपडळ, हडपसर सोलापूर रोड डावी बाजू, साडेसतरा नळी, भोसले गार्डन, माळवाडी, मगरपट्टा सिटी, हडपसर आकाशवाणी, पिंगळेवस्ती, मुंढवा, केशवनगर, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, गुलामआली नगर, श्रीराम चौक परिसर, रामटेकडी, रामनगर परिसर अंतर्गत होणारा भागातील पाणीपुरवठा.
advertisement
गळती दुरुस्तीसाठी लागणारी सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रामटेकडी टाकी येथील पाणी पंपिंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र पाणी जमा होणे तसेच जलशुद्धीकरण प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने पुढील काही तास पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी पाणी वापर जपून करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 6:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या भागात जलसंकट?









