400 वर्षांची परंपरा असलेल्या आकुर्डीतील स्वयंभू खंडोबाची यात्रा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी, यात्रा नेमकी केव्हा?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
नवसाला पावणारे मंदिर म्हणून आकुर्डीतील श्री खंडोबा मंदिराची ओळख आहे. येथील श्री खंडोबाची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिराच्या यात्रेला सुमारे 400 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे.
प्रतिनिधी- पूजा सत्यवान पाटील, पुणे
पुणे: पिंपरी- चिंचवडमधील आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिरात 26 आणि 27 डिसेंबर रोजी दोन दिवसांची खंडोबा यात्रा भरवली जाते. या यात्रेसाठी दोन दिवसांत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे मंदिर म्हणून आकुर्डीतील श्री खंडोबा मंदिराची ओळख आहे. येथील श्री खंडोबाची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिराच्या यात्रेला सुमारे 400 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे.
advertisement
यात्रेच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिरात 26 डिसेंबरपासून दोन दिवसांची यात्रा भरवली जाणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे 5.30 वाजता मंगलस्नान व महाअभिषेकाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती होईल. रात्री 9 वाजता श्री खंडोबांची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणार आहे.
advertisement
दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता खंडोबा सांस्कृतिक भवन, आकुर्डी येथे यात्रेचा मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी पालखी सोहळ्यात श्री खंडोबा आणि श्री म्हाळसा देवी घोड्यावर स्वार रूपात भाविकांना दर्शन देणार असून, हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
काय आहे या मंदिराचा इतिहास ?
view commentsखंडोबा मंदिराला 900 वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार खंडोबा देव स्वतः या ठिकाणी अवतरल्याची आख्यायिका प्रचलित आहे.स्थानिक कथेनुसार, येथे असलेल्या विहिरीजवळ एक व्यक्ती कपडे धूत असताना खंडोबा देव प्रकट झाले. त्या वेळी देवांनीही स्वतःची वस्त्रे त्या विहिरीत धुतली, अशी आख्यायिका सांगितली जाते.या मंदिरातील खंडोबाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, मूर्तीच्या खाली दोन लिंग स्वरूपातील प्रतीके आहेत. यात्रेसह वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
400 वर्षांची परंपरा असलेल्या आकुर्डीतील स्वयंभू खंडोबाची यात्रा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी, यात्रा नेमकी केव्हा?









