राजकीय हालचालींना वेग, चाकणकरांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, खरात प्रकरणावर म्हणाल्या...
- Published by:Sachin S
Last Updated:
अशातच रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस महासंचलकांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक झाली आहे. अशोक खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहे. त्यामुळे एका भोंदूबाबा आणि बलात्कारी माणसाच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षांचे फोटो समोर आल्यामुळे विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. अखेरीस या वादावर चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. "मी माझी भूमिका लवकर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार' असं रूपाली रूपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
अशोक खरात याचे पाय धुताना आणि सोबत असतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर या पुरत्या अडचणीत सापडल्या आहे. मागील तीन दिवसांपासून रुपाली चाकणकर यांचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहे. अशातच रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस महासंचलकांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
advertisement
"मी माझी भूमिका लवकर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अद्याप भेट घेणार नसल्याचंही रूपाली चाकणकर यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान, या सगळ्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांकडे मागणी केली आहे.
दरम्यान, चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर पुण्याला रवाना झाल्यात. पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याबाबत पक्षात दोन प्रवाह आहे. त्यामुळे आता चाकणकर यांना आपल्या महिला आयोगपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 7:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
राजकीय हालचालींना वेग, चाकणकरांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, खरात प्रकरणावर म्हणाल्या...






