शरीरात 4 बुलेट,13 दिवस मृत्यूशी झुंज; घायवाळच्या कानशिलात लगावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पैलवान सागर मोहोळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या जामखेडमधील कुख्यात गुंड मोहळकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. नगरच्या जामखेडमधील गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी कुख्यात गुंड सागर मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जामखेड शहरात 4 मार्च रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. मोहोळकरच्या मृत्यूनंतर जामखेड आणि पुणे परिसरात तणावाचे वातावरण असून या प्रकरणाचे धागेदोरे पुण्याच्या कुख्यात 'निलेश घायवळ' टोळीशी जोडले गेल्याने खळबळ उडाली आहे. 4 मार्च रोजी सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जामखेडमध्ये गोळीबार केला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोहोळकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर त्याला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या, परंतु प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
पुण्यातून एका संशयीताला अटक
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पकडण्यात आलेला आरोपी पुण्याचा रहिवासी असून त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश घायवळ टोळीशी काय संबंध आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. गँगवार किंवा जुन्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
advertisement
गोळीबारामागे नेमका मास्टरमाईंड कोण?
पैलवान सागर मोहोळकरच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले आहे. अहमदनगर आणि पुणे पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या गोळीबारामागे नेमका मास्टरमाईंड कोण आहे आणि ही सुपारी कोणी दिली होती का? या दिशेने पोलिसांची चौकशी सुरू आहे.
निलेश घायवाळ कनेक्शन आणि जुना वाद
advertisement
सागर मोहळकर हे नाव गेल्या काही काळापासून गुन्हेगारी जगतात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. या चर्चेमागचे मुख्य कारण म्हणजे त्याने पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवाळ याच्या कानशिलात लगावली होती. या कृत्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती आणि तेव्हापासूनच मोहळकर अनेकांच्या निशाण्यावर होता. त्यामुळे त्याच्यावरील गोळीबार गँगवॉरमधूनच करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यात स्थानिक गुन्हेगारी किंवा घायवळ टोळीचा हात असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 8:41 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शरीरात 4 बुलेट,13 दिवस मृत्यूशी झुंज; घायवाळच्या कानशिलात लगावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू










