advertisement

मोठी बातमी! वसंत मोरेंना झटका, कोणत्याह क्षणी अटक होण्याची शक्यता

Last Updated:

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News18
News18
पुणे :  पुणे शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि आक्रमक वक्ते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुणे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे शिवाजीनगर पोलीस आता वसंत मोरे यांच्या अटकेसाठी आक्रमक पावले उचलण्याची शक्यता आहे.
advertisement

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांचे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत लहाडे कुटुंबियांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसंत मोरे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement

कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

गुन्हा दाखल झाल्यापासून वसंत मोरे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांना आता मोरेंना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

25 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वादग्रस्त वक्तव्ये देखील केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मोठी बातमी! वसंत मोरेंना झटका, कोणत्याह क्षणी अटक होण्याची शक्यता
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement