रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, पुण्यात उभारण्यात येणार स्लिपिंग पॉड्स, किती असेल दर?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रेल्वेला विलंब झाल्यास प्रवाशांना आरामात बसण्याची किंवा झोपण्याची सोय आरक्षण केंद्राजवळील एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकावर आता आधुनिक स्लिपिंग पॉड्सची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. रेल्वेला विलंब झाल्यास प्रवाशांना आरामात बसण्याची किंवा झोपण्याची सोय आरक्षण केंद्राजवळील एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे 36 लाख रुपये खर्च झाला आहे. हा उपक्रम प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना आता ताटकळत थांबावं लागणार नाही.
रेल्वे प्रवाशांना अनेकदा गाड्यांची वाट पाहावी लागते किंवा स्थानकावर उतरल्यावर थोडा विश्रांतीसाठी थांबावे लागते. अशा वेळी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने बसण्यासाठी सुद्धा जागा नसते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये थोड्या वेळासाठी राहणे महाग पडते किंवा सोयीचे वाटत नाही. अशा प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर आता आधुनिक स्लिपिंग पॉड्सची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या पॉड्समुळे प्रवाशांना आता स्थानकावरच कमी खर्चात आरामदायी मुक्काम करता येईल. या प्रकल्पासाठी सुमारे 36 लाख रुपये खर्च झाला आहे.
advertisement
जपानी संकल्पनेवर आधारित स्लिपिंग पॉड्स पुण्यात
जपानमध्ये तयार केलेले पॉड हॉटेल प्रवाशांसाठी एक लहान, आरामदायी आणि वातानुकूलित बेडची सुविधा देतात. मोठी खोली भाड्याने घेण्याऐवजी प्रवासी फक्त बेडसाठी भाडे भरतात, जे थोडक्यात मुक्कामासाठी सोयीचे आणि स्वस्त ठरते. पुणे रेल्वे स्थानकावरही या संकल्पनेचा अवलंब करून सध्या 24 स्लिपिंग पॉड्स तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकावरच कमी खर्चात आराम करण्याची संधी मिळेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
advertisement
पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले की, प्रवाशांना स्लिपिंग पॉड्स कमी दरात आणि तासांनुसार उपलब्ध केले जातील. जितका वेळ प्रवासी मुक्काम करेल, त्याच प्रमाणात भाडे भरावे लागेल. हॉटेलमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या प्रवाशांसाठी हा एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय ठरणार आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 9:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, पुण्यात उभारण्यात येणार स्लिपिंग पॉड्स, किती असेल दर?






